निकालाच्या आदल्या दिवशी तिनं आत्महत्या केली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 06:52 PM2019-05-28T18:52:47+5:302019-05-28T18:53:33+5:30

निकालाच्या आदल्या दिवशी गळफास घेऊन संपवलं जीवन

student who commits suicide before hsc results scores 62 46 percent | निकालाच्या आदल्या दिवशी तिनं आत्महत्या केली अन्...

निकालाच्या आदल्या दिवशी तिनं आत्महत्या केली अन्...

Next

यवतमाळ : बारावीच्या निकालाआधी आत्महत्या करणारी विद्यार्थिनी प्रथम श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाली. यवतमाळमधील बाभूळगावात राहणाऱ्या चेतना सदानंद शिंगाडेनं काल राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज बारावीचा निकाल लागला. त्यात चेतनाला 62.46 टक्के गुण मिळाले. 

घरी कोणी नसल्याचं राहून चेतनानं गळफास लावून आत्महत्या केली होती. चेतनानं काल (सोमवारी) सकाळी साडे नऊच्या सुमारास तिचा जीवनप्रवास संपवला. चेतनानं टोकाचं पाऊल उचललं त्यावेळी तिचे आई, वडील व कुटुंबातील सदस्य मजुरीसाठी गेले होते. घरात असलेल्या दोन लहान बहिणी बाहेर जाताच चेतनानं घरातच गळफास लावला. तिच्या आत्महत्येचे कारण कळू शकलं नाही. या प्रकरणी बाभूळगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

चेतनानं नानीबाई घारफळकर विद्यालयातून बारावीची परीक्षा दिली होती. अभ्यासात हुशार असलेल्या चेतनानं हे टोकाचे पाऊल का उचललं असावं, याविषयी तर्कवितर्क लावले जात होते. यानंतर आज परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात चेतना 62.46 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली. 
 

Web Title: student who commits suicide before hsc results scores 62 46 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.