आभासी शिक्षणप्रणाली विद्यार्थ्यांनी आत्मसात केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:44 AM2021-07-30T04:44:07+5:302021-07-30T04:44:07+5:30
फोटो दिग्रस : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विपरित परिस्थितीत शाळा डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्थलांतरित झाल्या. ऑनलाइन शिक्षणप्रणालीमध्ये काही अंशी दोष जरी असले ...
फोटो
दिग्रस : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विपरित परिस्थितीत शाळा डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्थलांतरित झाल्या. ऑनलाइन शिक्षणप्रणालीमध्ये काही अंशी दोष जरी असले तरीही विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानासह तंत्रज्ञानही शिकत आहेत, असे मत डॉ. संजय बंग यांनी व्यक्त केले.
येथील विद्यानिकेतन शाळेमध्ये आभासी पद्धतीने भाषण स्पर्धा घेण्यात आली. त्यावेळी शाळेचे अध्यक्ष डॉ. संजय बंग यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, नियमित वर्गाच्या तुलनेत ऑनलाइन वर्गांमध्ये एकाग्रता अधिक चांगली होते. शिवाय लवकर उठून शाळेत जाण्यापेक्षा घरातून सुरक्षित पद्धतीने शिकणे सोयीचे ठरते, असे मुलांना वाटते. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा विद्यार्थ्यांनी मनापासून अवलंब करून तो प्रभावीपणे आत्मसात केला, असे मत त्यांनी व्यक्त केले.
विविध गटांमध्ये विविध विषयासह फेसबुक लाइव्ह करून स्पर्धक विद्यार्थ्यांसह उर्वरित विद्यार्थी व पालकांनीसुद्धा या भाषण स्पर्धेचा घरबसल्या आनंद घेतला. कोरोना काळातील नवीन शिक्षाप्रणाली, महामारीमध्ये बदललेली जीवनशैली, आधुनिक शिक्षणप्रणालीमुळे माझ्या जीवनात झालेले बदल, स्पर्धात्मक जगात आपण स्वतः कुठे उभे आहोत?, लोकशाही देशाचे भविष्य निश्चित करते काय?, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण, असे अनेक महत्त्वपूर्ण विषय भाषण स्पर्धेसाठी ठेवले होते. विद्यार्थ्यांनी सुंदर भाषणे दिली.
बॉक्स
चिमुकल्यांनी घेतला उत्साहाने सहभाग
स्पर्धेत पाचवी ते आठवीच्या गटातून उत्कर्षा मानकर, अनन्या अटल, सौम्या साबळे, पहिली ते चौथीच्या गटातून अन्वी कांबळे, सारा देवस्थळे, अक्षता कपिले यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. स्पर्धेत ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक निवृत्ती ढोडरे, नितीन राऊत, विलास राऊत, दीपाली ताजने, सरिता गौर, स्नेहा चिंतावर, हर्षल काटकर, कल्याणी, दहिफळे, आरती जाधव, कृपाली कपिले यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन पूनम धानुका, तर आभार हेमंत दुबे यांनी मानले.