भांबोरा येथील विद्यार्थ्यांची जिल्हा परिषदेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 11:44 PM2019-03-06T23:44:42+5:302019-03-06T23:45:12+5:30

घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व पालकांनी बुधवारी जिल्हा परिषदेत धडक दिली. त्यांनी शिक्षकावरील प्रस्तावित कारवाईचा विरोध केला.

Students of Bhambra hit the Zilla Parishad | भांबोरा येथील विद्यार्थ्यांची जिल्हा परिषदेवर धडक

भांबोरा येथील विद्यार्थ्यांची जिल्हा परिषदेवर धडक

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षकावर कारवाईला विरोध : पालकांमध्ये दोन मतप्रवाह

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व पालकांनी बुधवारी जिल्हा परिषदेत धडक दिली. त्यांनी शिक्षकावरील प्रस्तावित कारवाईचा विरोध केला.
भांबोरा येथील विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत सदस्यांनी बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांना निवेदन दिले. २६ जानेवारीला मुख्याध्यापक अशोक मोहुर्ले यांनी गावकऱ्यांसमक्ष सरपंच व सचिवांकडे १४ व्या वित्त आयोगातील निधीची मागणी केली. वित्त आयोगाच्या निधीत शिक्षणावरील खर्चाची तरतूद आहे. त्याच दिवशी आयोजित ग्रामसभेत पालकांनीही निधीबाबत विचारणा केली. त्यावर सरपंच व सचिव निरुत्तर झाले. त्यानंतर आठ दिवसांनी मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची तक्रार झाली. मात्र ही तक्रार बिनबुडाची असल्याचा आरोप निवेदनकर्त्या नागरिकांनी निवेदनातून केला.
दरम्यान, याप्रकरणी संबंधित मुख्याध्यापकावर कारवाईसाठी विद्यार्थी व पालकांनी यवतमाळात आंदोलन सुरू केले. मुख्याध्यापकावर बदली व निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. मात्र केवळ एक-दोन पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापकावर कारवाई करू नये, त्यांना तेथेच कायम ठेवावे, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांनी सीईओंकडे केली आहे. यावेळी अनेक पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले.

Web Title: Students of Bhambra hit the Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.