यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 01:25 PM2018-04-23T13:25:19+5:302018-04-23T13:25:28+5:30

आईसोबत नदीपात्रावर गेलेल्या एका १२ वर्षीय विद्यार्थ्याचा पैनगंगा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उमरखेड तालुक्यातील पळशी येथे सोमवारी दुपारी ११ वाजताच्या सुमारास घडली.

The student's death by drowning in the Painganga River in Yavatmal district | यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देउमरखेड तालुक्याच्या पळशीची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क 
यवतमाळ : आईसोबत नदीपात्रावर गेलेल्या एका १२ वर्षीय विद्यार्थ्याचा पैनगंगा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उमरखेड तालुक्यातील पळशी येथे सोमवारी दुपारी ११ वाजताच्या सुमारास घडली.
अजय विश्वंभरराव कदम (१२) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सहाव्या वर्गात शिकत होता. सोमवारी त्याची आई गावालगतच्या नदीपात्रावर कपडे धुण्यासाठी गेली होती. सोबत अजयही होता. नदीपात्रात पाण्यात अजय उतरला असता तो बुडाला. हा प्रकार लक्षात येताच परिसरात असलेल्या नागरिकांनी धाव घेतली. त्याचा शोध घेतला असता मृतदेहच हाती लागला. विशेष म्हणजे, गत काही दिवसांपासून पैनगंगेचे पात्र कोरडे पडले होते. रविवारी इसापूर धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणीटंचाईमुळे नदीपात्रात पाणी सोडले. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात होते. तसेच रेती उत्खननामुळे पात्रात मोठाले खड्डे पडून डोह निर्माण झाले. त्याच डोहात अजय बुडाल्याचा संशय आहे. त्याच्या मागे आई, वडील, तीन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: The student's death by drowning in the Painganga River in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.