पांढरकवडा आदिवासी प्रकल्पातील विद्यार्थी माघारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 03:49 PM2019-07-11T15:49:12+5:302019-07-11T15:54:08+5:30

आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील पांढरकवडा आदिवासी विकास प्रकल्प शैक्षणिक गुणवत्तेत माघारल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

Students of Pandharkawada tribal project are not doing well | पांढरकवडा आदिवासी प्रकल्पातील विद्यार्थी माघारले

पांढरकवडा आदिवासी प्रकल्पातील विद्यार्थी माघारले

Next
ठळक मुद्देशैक्षणिक गुणवत्ता ऐरणीवरअभियांत्रिकी, वैद्यकीयसाठी एकही विद्यार्थी पात्र नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील पांढरकवडा आदिवासी विकास प्रकल्प शैक्षणिक गुणवत्तेत माघारल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
राज्यातील शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांसाठी खास ‘स्क्रिनींग टेस्ट’ घेण्यात आली. यातून ५० विद्यार्थी ‘आयआयटी’साठी तर ५० वैद्यकीय शिक्षणासाठी निवडले जाणार आहे. ‘पेस’ या संस्थेला महाराष्ट्र शासनाने या परीक्षेचा कंत्राट दिला आहे. २८ जून रोजी राज्यभर ही परीक्षा घेतली गेली. यवतमाळ जिल्ह्यात शासकीय आदिवासी आमश्रशाळा चिचघाट हे परीक्षा केंद्र होते. या परीक्षेचा नुकताच निकाल लागला. त्यात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ३१३ तर अभियांत्रिकीसाठी ३०४ विद्यार्थी राज्यभरातून पात्र ठरले. या विद्यार्थ्यांमधून आता पुन्हा मेरिटवर छाननी करून वैद्यकीय व अभियांत्रिकीसाठी प्रत्येकी ५० विद्यार्थी निवडले जाणार आहेत. परंतु या पात्र विद्यार्थ्यांमध्ये जिल्ह्यातील पांढरकवडा आदिवासी प्रकल्पाचा एकही विद्यार्थी स्थान मिळवू शकलेला नाही. यावरून या प्रकल्पातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कशी असेल याची कल्पना येते. या उलट राज्याच्या बहुतांश प्रकल्पातील विद्यार्थी ‘पेस’ने घेतलेल्या परीक्षेत पात्र ठरले आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील पुसद आदिवासी विकास प्रकल्पाच्या विद्यार्थ्यांनीही यात स्थान मिळविले.
‘आयएएस’ पीओ असलेल्या पांढरकवडा प्रकल्पाची शैक्षणिक प्रगती मात्र खुंटल्याचे दिसते. पांढरकवडा प्रकल्प अधिकाऱ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेऊनही दहावीचा निकाल चांगला आला नाही. याच कारणावरून पांढरकवडा आदिवासी प्रकल्पातील ४० शिक्षकांवर कारवाईही केली गेली.

विषय शिक्षकांकडून अल्प प्रतिसाद
पांढरकवडा प्रकल्प अधिकाऱ्याकडून शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातात. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांवर त्यांचा अधिक ‘फोकस’ असतो. परंतु त्यांना अधिनस्त आश्रमशाळांच्या अनेक विषय शिक्षकांकडून तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. ‘पीओं’कडून राबविले जाणारे उपक्रम या शिक्षकांना जाचक वाटतात. पीओंची विद्यार्थ्यांच्या मेरिटसाठी तळमळ असली तरी शिक्षक तेवढे परिश्रम घेत नसल्याचे विसंगत चित्र आहे.

Web Title: Students of Pandharkawada tribal project are not doing well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.