उमरखेडमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:26 AM2021-07-09T04:26:48+5:302021-07-09T04:26:48+5:30

उमरखेड : एमपीएससी, पोलीस भरती आदी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढून तहसील कार्यालयावर ...

Students protest in Umarkhed | उमरखेडमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

उमरखेडमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

Next

उमरखेड : एमपीएससी, पोलीस भरती आदी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडक दिली.

पुणे येथील स्वप्नील लोणकर या तरुणाने नियुक्ती मिळत नसल्यामुळे आत्महत्या केली. यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांत संतापाची लाट पसरली. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांवर आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे वाईट वेळ आली आहे. शहरात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवरदेखील परिणाम झाला आहे. त्यामुळे गुरुवारी शहरातील विद्यार्थ्यांनी पुरोगामी युवा ब्रिगेडच्या नेतृत्वात तहसीलवर धडक दिली.

स्वप्नील लोणकर याला श्रद्धांजली वाहून छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून विद्यार्थी आक्रोश मोर्चा सुरू झाला. पुस्तके हातात घेऊन विद्यार्थी सहभागी झाले. नंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. त्यातून आयोगाच्या कामकाजात गती आणावी, सरळ सेवा भरती त्वरित सुरू करावी, एमपीएससीची पदे भरावी, परीक्षेची तारीख निश्चित करून ठरलेल्या तारखेलाच परीक्षा घ्यावी, पोलीस भरती आणि राज्यसेवा पदांच्या संख्येत वाढ करावी, पीएसआय शारीरिक चाचणी परीक्षा पूर्ववत करावी, सरळसेवा परीक्षेतील गोंधळ कमी करावा, सरळ सेवेतील पदाची भरती पोर्टलमार्फत न करता आयोगामार्फत करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदन देताना नितीन शिंदे, सरोज देशमुख, सपना चौधरी, शरद वारकड, धीरज पवार, परमेश्वर रावते, हाजी इर्शाद, सागर शेरे, शिवशंकर सुरोशे, मनोज धुळध्वज, अनिल हरणे, अनिल ढोबळे, ज्ञानेश्वर लोखंडे, आकाश रुडे, शिवप्रसाद तंगडवाड, अविनाश चंद्रवंशी, शुभम जवळगावकर, ताहेर शाह, कृष्णा जाधव, आतिश वटाणे, चंदन सावते, रोहित राठोड, उल्हास शेळके, अंबादास गव्हाळे, दत्ता दिवेकर, अक्षय घायर, मिलिंद राठोड, सुनील जाधव, अस्लम शेख, आकाश सुरोशे, शाहरुख पठाण आदी उपस्थित होते.

बॉक्स

झेडपी, आरोग्यची भरती प्रक्रिया सुरू करा

जिल्हा परिषद व आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, वय निघून गेलेल्या उमेदवारांना वयोमर्यादा वाढून द्यावी, स्वप्नील लोणकरच्या परिवाराला आर्थिक मदत देऊन त्याच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे आदी मागण्याही केल्या. तसेेच ऑनलाइन शिक्षण बंद करून शाळा व कॉलेज सुरू करावे, खासगी शिकवण्या सुरू कराव्यात आदी मागण्या घेऊन मोर्चा तहसीलवर धडकला.

Web Title: Students protest in Umarkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.