यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस येथील शालेय विद्यार्थी ‘माती’च्या आहारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:50 AM2017-12-28T11:50:54+5:302017-12-28T11:53:52+5:30

यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस शहरातील शालेय विद्यार्थ्यांना माती विकत घेऊन खाण्याच्या व्यसनाने पछाडले आहे. शाळेसमोर दोन-तीन रुपयात मिळणारे मातीचे पाकीट विकत घेऊन विद्यार्थी चवीने ही माती खाताना दिसून येतात.

The students of in Yavatmal district eat soil | यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस येथील शालेय विद्यार्थी ‘माती’च्या आहारी

यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस येथील शालेय विद्यार्थी ‘माती’च्या आहारी

Next
ठळक मुद्देशाळांसमोर खुलेआम विक्री विषाचा अंश असण्याची शक्यता

प्रकाश सातघरे ।
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस शहरातील शालेय विद्यार्थ्यांना माती विकत घेऊन खाण्याच्या व्यसनाने पछाडले आहे. शाळेसमोर दोन-तीन रुपयात मिळणारे मातीचे पाकीट विकत घेऊन विद्यार्थी चवीने ही माती खाताना दिसून येतात. या मातीमध्ये विषारी अंश असल्याचे सांगितले जात असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
शहरातील शाळा व महाविद्यालयासमोर अनेक दुकानामध्ये माती खुलेआम विकली जात आहे. मातीचे पाकीट दोन-तीन रुपयाला मिळते. पांढऱ्या रंगाचे खडे असलेली ही माती विद्यार्थी विकत घेवून खातात. ही माती खालल्यानंतर दिवसभर भूक लागत नाही आणि थोडी गुंगी येत असल्याचे सांगितले जाते. हा प्रकार गेल्या कित्येक दिवसापासून खुलेआम सुरू आहे. परंतु यावर कुणीही आक्षेप घेतला नाही. विशेष म्हणजे ही माती पोटात गेल्यानंतर त्याचे गोळे बनतात. काही दिवसातच त्याचा परिणाम रक्तवाहिन्यांवर होवून किडणीचे आजारही उद्भवू शकतात. ही माती नेमकी काय आहे याचा तपास होणे गरजेचे असल्याचे पालकांचे मत आहे.
अनेक विद्यार्थ्यांना या मातीचा त्रास झाल्याचे सांगितले जाते. काही पालकांनी मुख्याध्यापकांना माहिती दिली. वर्गशिक्षकांनी माती खाण्यास मनाई केली. बॅगची तपासणी करण्यात आली. हा प्रकार उजेडात आल्याने अनेक पालकांनी मुलांना याबाबत सूचना दिली. यावर वेळीच अटकाव आणला नाही तर विद्यार्थी नशेच्या आहारी जाण्याची भीती आहे.

विद्यार्थी नशेच्या आहारी
दिग्रस शहरातील १५ ते १७ वयोगटातील अनेक मुले खर्रा, तंबाखू, सिगारेट एवढेच नव्हेतर दारू आणि गांजाच्या आहारी गेले आहे. अनेक मुले दिवसभर या नशेच्या अंमलात असतात. नशेतून सुसाट वेगाने दुचाकी चालविणे असे प्रकार घडतात. पोलिसांनी यावर लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: The students of in Yavatmal district eat soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य