कुंभा येथील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:41 AM2021-09-13T04:41:29+5:302021-09-13T04:41:29+5:30
हटवंजारी गावात डेंग्यूची साथ मारेगाव : तालुक्यातील हटवंजारी येथे गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूची साथ पसरली असून, प्रत्येक घरात डेंग्यूचे ...
हटवंजारी गावात डेंग्यूची साथ
मारेगाव : तालुक्यातील हटवंजारी येथे गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूची साथ पसरली असून, प्रत्येक घरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे. विशेषतः लहान मुलांना मोठ्या प्रमाणात डेंग्यूची लागण होत आहे. गावात घाणीचे साम्राज्य असून नाल्याची अनेक दिवसांपासून सफाई केल्या गेली नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे प्रशासनाने नाली सफाई करावी, अशी मागणी होत आहे.
मनोज साकला यांनी रुग्णवाहिका दिली भेट
मारेगाव : मनोज साकला यांनी कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे व ग्रामवासीयांच्या मागणीला मान देत कुंभा गावाकरिता दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर रुग्णवाहिका देणार असल्याची माहिती दिली. कुंभा परिसरात अनेक गावे दुर्गम भागात असून, रुग्णांना वेळेवर कोणतेही वाहन उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेकदा रुग्णांना प्राणसुद्धा गमवावे लागले. त्यामुळे या परिसरात रुग्णवाहिका मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होता. आता हक्काची रुग्णवाहिका मिळणार असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.