सुभाष दुधे खून खटला जलदगती कोर्टात चालवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 09:31 PM2018-11-15T21:31:09+5:302018-11-15T21:31:56+5:30

येथील नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष दुधे यांच्या खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी बारी समाज संघटनेच्यावतीने येथील उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Subhash Dudh murder case: Run in a fast track court | सुभाष दुधे खून खटला जलदगती कोर्टात चालवा

सुभाष दुधे खून खटला जलदगती कोर्टात चालवा

googlenewsNext
ठळक मुद्देबारी समाजाच्या मोर्चाची धडक : दारव्हा एसडीओंना मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : येथील नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष दुधे यांच्या खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी बारी समाज संघटनेच्यावतीने येथील उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन एसडीओंना सादर करण्यात आले.
१४ आॅक्टोबर रोजी येथील भाजी मार्केट परिसरात सुभाष दुधे यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. संपूर्ण तालुक्याला हादरवून सोडणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ बारी समाजाच्यावतीने शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालय परिसरात मोर्चा पोहोचल्यानंतर एसडीओंना निवेदन देण्यात आले. जलदगती न्यायालयात खटला चालवावा, खटल्याचे कामकाज चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, या खुनातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. दारव्हा शहरातून निघालेल्या या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले होते. मोर्चामध्ये महिलांची संख्या मोठी होती.

Web Title: Subhash Dudh murder case: Run in a fast track court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.