फटाकेमुक्त दिवाळीसाठी अशीही धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 06:00 AM2019-10-27T06:00:00+5:302019-10-27T06:00:10+5:30
वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालयाने दर शुक्रवारी ‘फ्राय डे फॉर फ्युचर’ हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार दर शुक्रवारी प्रदूषण रोखण्यासाठी आंदोलन केले जाते. हे जन आंदोलन व्हावे आणि पर्यावरण संवर्धन व्हावे हा उद्देश आहे. यातूनच शुक्रवारी फटाके विरोधी अभियान राबविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : फटाक्यांच्या आतषबाजीने प्रदूषणात मोठी भर पडते. दिवसन्दिवस प्रदूषण वाढतच आहे. हे प्रदूषण थांबविण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयाने प्रदूषणमुक्त दिवाळीसाठीफटाके विरोधी अभियान राबविण्यात आले. त्याकरिता विद्यार्थ्यांनी सायंकाळी बसस्थानक चौकात निदर्शने केली.
वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालयाने दर शुक्रवारी ‘फ्राय डे फॉर फ्युचर’ हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार दर शुक्रवारी प्रदूषण रोखण्यासाठी आंदोलन केले जाते. हे जन आंदोलन व्हावे आणि पर्यावरण संवर्धन व्हावे हा उद्देश आहे. यातूनच शुक्रवारी फटाके विरोधी अभियान राबविण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हातात पर्यावरण संवर्धनाचे फलक उंचावले. या अभिनव आंदोलनाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी अश्वजित शेळके, देवीचंद पवार, कृष्णकांत चव्हाण, प्राची वानखडे, साक्षी येंडे, अंनिसचे विजय गाडगे, किशोर पारटकर, विवेकानंद लभाने, अभय काळे, प्रा. घनश्याम दरणे यांच्यासह अनेकांचा यामध्ये समावेश होता.