पुसद तालुक्यातील नागरिक खोकल्याने बेजार

By admin | Published: July 24, 2016 12:46 AM2016-07-24T00:46:48+5:302016-07-24T00:46:48+5:30

अति पावसामुळे आणि वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील नागरिक खोकल्याने बेजार झाले आहेत.

Suffered due to coughing citizens in Pusad taluka | पुसद तालुक्यातील नागरिक खोकल्याने बेजार

पुसद तालुक्यातील नागरिक खोकल्याने बेजार

Next

वातावरण बदल : पावसामुळे रूग्णालयांत वाढली प्रचंड गर्दी
पुसद : अति पावसामुळे आणि वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील नागरिक खोकल्याने बेजार झाले आहेत. घरगुती उपचार करूनही आराम मिळत असल्याने अनेक नागरिक रूग्णालयाकडे धाव घेत आहे. त्यामुळे शहरातील रूग्णालये हाउसफुल्ल दिसून येत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण, वातावरणातील चढउतर, अति पावसामुळे तालुक्यातील नागरिकांना सर्दी, पडसा, खोकला, तापाचे आजार बळावत आहेत. अनेकांना घशाचा आजार वाढत आहे. थंडी वाजून ताप येण्याचे प्रमाणही गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढले आहे. यावर नागरिक प्रथम घरगुती उपचार करतात. त्यातून आराम मिळाल्यास ते रूग्णालयाची वाट धरत नाही. मात्र आराम न मिळाल्यास त्यांना अखेर रूग्णालयाची वाट धरावीच लागते.
वातावरणातील बदल आणि सततच्या पावसामुळे संसर्गजन्य विषाणूंची वाढ होण्यास मदत मिळते. सध्याचे वातावरण विषाणूंची वाढ होण्यास अत्यंत पोषक ठरत आहे. त्यामुळे पाण्यातून होणाऱ्या आजारांतही सतत वाढ होत आहे. यात शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणुंमुळे नागरिकांना सर्दी, पडसा, डोकेदुखी, ताप, खोकला, पाठदुखी, अंगदुखी, उलटी, अतिसार आदी आजार बळावत आहे. अशा रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी शहरातील शासकीय रूग्णालयासह खासगी रूग्णालयांतही गर्दी वाढू लागली आहे.
या वातावरणाचा सर्वाधिक फटका चिमकुल्यांना बसत आहे. त्यामुळे पालक काळजीत सापडले आहेत. डॉक्टर मंडळी अशा वातावरणात विशेष काळजी घेण्याचे आवाहन करीत आहे. नागरकिांनी पाणी उकळून प्राशन करावे. पाण्यात निर्जंतुक औषधांचा वापर करावा, असे आवहन केले जात आहे. सोबतच नगरपरिषदेने शुद्ध पाणी पुरवठा करणेही गरजेचे आहे. नागरिकांनाकडून नगरपरिषद, जिल्हा परिषद, ग्रामंपचायतींनी याबाबत दक्षता घेण्याची मागणी होत आहे.
सध्या पावसामुळे नदी, नाल्यांना गढूळ पाणी येत आहे. तेच पाणी नागरिकांना पुरविले जात आहे. प्रथम हे पाणी शुद्ध करणे आवश्यक आहे. मात्र ग्रामीण भागात अनेक ठिकाणी साधे ब्लिचींग पावडरही पाण्यात टाकले जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. शहरातही काही प्रमाणात हीच परिस्थिती आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

पाऊस, उन्हाचा लपाछपीचा खेळ सुरूच
गेल्या १५ दिवसांपासून पुसद तालुक्यात पाऊस आणि उन्हाचा लपाछपीचा खेळ सुरू आहे. हे वातावरण विषाणुंसाठी अत्यंत पोषक ठरत आहे. त्यांच्यासाठी हे वातावरण नंदनवनच ठरले आहे. तापमानात सतत चढउतार सुरू आहे. त्यामुळे हवेत बाष्प निर्माण झाले, तर विषाणुंची संख्या वाढते. त्यातून विषाणुंचा संसर्ग बळावण्याची शक्यताही तेवढीच वाढते.
नागरिकांनी काळजी घेण्याची गरज
साथ रोगांचा प्रसार होऊ नये म्हणून नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. या काळात हलका आहार घ्यावा. तसेच फळे व भाजीपाल्यांचा आहारात समावेश करावा. जेवणात आंबट पदार्थांचा वापर टाळावा. उघड्यावरील पदार्थ खावू नये. पाणी उकळूनच प्राशन करावे. शती पदार्थांचा वापरही टाळावा. ही खबरदारी घेतल्यास आजारापासून बचाव होण्याची शक्यता असल्याचे अनेक डॉक्टरांनी सांगितले.

 

Web Title: Suffered due to coughing citizens in Pusad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.