तीन तालुक्यातील ऊस उत्पादक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 05:00 AM2020-08-29T05:00:00+5:302020-08-29T05:00:27+5:30

पूर्वीचा हा सहकारातील साखर कारखाना भैरवनाथ ठोंबरे यांनी तीन वर्षांपासून विकत घेतला होता. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी तरला होता. तालुक्यात सिंचन व्यवस्था व कसदार जमीन असल्याने उसाचे क्षेत्र बऱ्या प्रमाणात आहे. वास्तविक या तीन तालुक्यातील तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. त्यामुळे हा साखर कारखाना विकल्या गेला अन् नाही चालला, तर या विभागातील ऊस शेतकरी देशोधडीला लागणार आहे.

Sugarcane growers in three talukas are worried | तीन तालुक्यातील ऊस उत्पादक चिंतेत

तीन तालुक्यातील ऊस उत्पादक चिंतेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : तालुक्यातील गुंज-सवना साईटवर असलेला नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज हा कारखाना विक्रीस काढण्यात आला असून दोन दिवसांपूर्वी निविदा निघाली आहे. त्यामुळे महागाव, पुसद, उमरखेड या तीन तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत.
पूर्वीचा हा सहकारातील साखर कारखाना भैरवनाथ ठोंबरे यांनी तीन वर्षांपासून विकत घेतला होता. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी तरला होता. तालुक्यात सिंचन व्यवस्था व कसदार जमीन असल्याने उसाचे क्षेत्र बऱ्या प्रमाणात आहे. वास्तविक या तीन तालुक्यातील तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. त्यामुळे हा साखर कारखाना विकल्या गेला अन् नाही चालला, तर या विभागातील ऊस शेतकरी देशोधडीला लागणार आहे.
खासगी कंपनी भलेही हा साखर कारखाना विकण्याचा निर्णय घेत असेल, तरी हा कारखाना अविरत सुरू राहावा अशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. बंद असलेला हा साखर कारखाना ठोंबरे यांनी विकत घेतल्यानंतर ऊस उत्पादक शेतकºयांनी ऊस लागवडीचे क्षेत्र वाढविले. त्यामुळे तालुक्याची ही कामधेनू परत बंद पडली तर ‘आली सुगी फुगले गाल.. गेली सुगी मागचे हाल’ ही परिस्थिती शेतकºयांवर ओढविण्याची भीती आहे.
चेअरमन यांनी हा कारखाना विक्रीसंदर्भात फेरविचार करावा, अशी ऊस उत्पादक शेतकºयांकडून मागणी होत आहे. कारखाना क्षेत्रात पाण्याची मुबलक व्यवस्था आहे, विजेचा प्रश्न नाही, कामगारांचा प्रश्न नाही, पाहिजे तेवढा ऊस साठा आहे. मग हा कारखान विकून आम्हाला कशाला देशोधाडीला लावताय साहेब? हा कारखाना विकू नका हो.. असा टाहो महागाव, पुसद, उमरखेड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी फोडत आहेत.

गाळप हंगाम सुरू करण्यासाठी कारखान्याने जवळपास पाच कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकºयांनी चिंता करू नये. ठरल्या वेळेत कारखाना सुरू होईल. विक्री संदर्भात निविदा प्रकाशित झाली असून बºयाच गोष्टी शिल्लक आहे.
- डी. एल. कदम, जीएम,
नॅचरल शुगर युनिट नंबर २ गुंज

Web Title: Sugarcane growers in three talukas are worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.