महिला बालकल्याण उपसभापतींची आत्महत्या, कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2021 05:35 PM2021-11-14T17:35:03+5:302021-11-14T18:43:31+5:30

सुरेखा मोहन मेंडके (वय ३८) रा. लक्ष्मीनगर, आर्णी असे मृत उपसभापतींचे नाव आहे. त्यांनी रविवारी राहत्या घरी गळफास लावला.

Suicide of child welfare deputy speaker | महिला बालकल्याण उपसभापतींची आत्महत्या, कारण अस्पष्ट

महिला बालकल्याण उपसभापतींची आत्महत्या, कारण अस्पष्ट

Next

यवतमाळ : आर्णी येथील नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विषय समितीच्या उपसभापतींनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी १.३० वाजता उघडकीस आली.

सुरेखा मोहन मेंडके (वय ३८) रा. लक्ष्मीनगर, आर्णी असे मृत उपसभापतींचे नाव आहे. त्यांनी रविवारी राहत्या घरी गळफास लावला. त्यांचे पती मोहन ट्रॅक्टरचालक आहे. ते कामानिमित्त सकाळी बाहेर गेले होते. मुलगा महेश हासुद्धा एका दुकानात गेला होता. मुलगा दुपारी घरी परतल्यानंतर त्याला आई गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यानंतर नागरिक गोळा झाले. त्यांनी सुरेखा यांना ग्रामीण रुग्णालयात नेले; मात्र डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. सुरेखा मेंडके २०१६ मध्ये प्रभाग क्र. ६ मधून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून विजयी झाल्या होत्या. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

Web Title: Suicide of child welfare deputy speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.