पेपर खराब गेल्याने यवतमाळात बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:17 PM2018-04-25T12:17:07+5:302018-04-25T12:17:07+5:30

बारावीचे पेपर खराब गेल्याने एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना येथील शिंदे नगरात बुधवारी सकाळी उघडकीस आली.

Suicide in Class XII Suicide in Yavatmal | पेपर खराब गेल्याने यवतमाळात बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

पेपर खराब गेल्याने यवतमाळात बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देनापास होण्याच्या भीतीने घेतला गळफास

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बारावीचे पेपर खराब गेल्याने एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना येथील शिंदे नगरात बुधवारी सकाळी उघडकीस आली.
वैशाली सुधाकर फुंदे (१७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती यवतमाळच्या अँग्लो हिंदी कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होती. नुकतीच तिने बारावीची परीक्षा दिली होती. मात्र या परीक्षेत पेपर खराब गेल्याने ती तणावाखाली होती. नापास झाल्यास घरचे काय म्हणतील या विचारात तिने मंगळवारी रात्री आपल्या घरातील बेडरूममध्ये गळफास लावून घेतला. हा प्रकार सकाळी उघडकीस आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. वैशालीचे वडील सुधाकर फुंदी जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता आहेत. तिच्या मागे आई, वडील व एक बहिण आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

Web Title: Suicide in Class XII Suicide in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.