बारामतीनंतर यवतमाळमध्ये पोलीस शिपायाची गळफास लावून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 09:44 PM2020-05-12T21:44:26+5:302020-05-12T21:46:32+5:30
संजयची पत्नी प्रसूती झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून माहेरीच होती.
यवतमाळ : येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस शिपायाने शासकीय निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजता उघडकीस आली.
संजय रतीराम साबळे (२७) बक्कल नं.२६१६ (रा.जेवली, ता.उमरखेड) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. तो गेल्या काही दिवसांपासून पोलीस मुख्यालयात कार्यरत होता. सध्या त्याची कोरोनाबाधित क्षेत्रातील इंदिरानगर येथे वायरलेस ड्यूटी लागली होती. मंगळवारी पळसवाडी कॅम्प येथील पोलीस वसाहतीतील घरी परत आल्यानंतर त्याने गळफास लावून आत्महत्या केली.
संजयची पत्नी प्रसूती झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून माहेरीच होती. संजय एकटाच राहात होता. त्याने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली ते स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी घटनास्थळी भेट दिली.
महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus मुंबईला मोठा दिलासा! नव्या रुग्णांची संख्या निम्म्याने घटली
Breaking स्वावलंबी भारतासाठी एकूण २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदार पुत्राची महामार्गावर घोडेस्वारी
CoronaVirus तळीरामांचे फावले! ऑर्डर दिल्यावर राज्यात दारु घरपोच मिळणार
चीनने युआनचे अवमुल्यन केले तर? अभिजीत बॅनर्जींनी सांगितले अर्थकारण
CoronaVirus अमेरिकेतील भारतीय मोठ्या संकटात; नोकरी गेली, एअर इंडियानेही नाकारले