किराणा व्यवसायिकाची निळोणा धरणात आत्महत्या
By विलास गावंडे | Updated: July 8, 2023 14:59 IST2023-07-08T14:58:36+5:302023-07-08T14:59:52+5:30
त्यांचा मृतदेह निळोणा धरणाच्या सांडव्यात आढळून आला

किराणा व्यवसायिकाची निळोणा धरणात आत्महत्या
यवतमाळ : किराणा व्यावसायिकाने येथील निळोणा धरणात आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. उदय बाबूराव काकडे (५०, रा. चापमनवाडी, यवतमाळ) असे मृताचे नाव आहे.
ते गुरुवारी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास दुचाकी घेऊन गेले होते. रात्री बराचवेळपर्यंत घरी पोहोचले नाही. सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह निळोणा धरणाच्या सांडव्यात आढळून आला. हा प्रकल्प शुक्रवारी ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे मृतदेह सांडव्यात वाहून आला.