यवतमाळ जिल्ह्यात क्वारंटाईन असलेल्या कम्पाऊंडरची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 07:26 PM2020-07-30T19:26:57+5:302020-07-30T19:27:52+5:30

यवतमाळ जिल्ह्यात होम क्वारंटाईन असलेल्या एका कम्पाऊंडरने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

Suicide of a quarantine compounder in Yavatmal district | यवतमाळ जिल्ह्यात क्वारंटाईन असलेल्या कम्पाऊंडरची आत्महत्या

यवतमाळ जिल्ह्यात क्वारंटाईन असलेल्या कम्पाऊंडरची आत्महत्या

Next
ठळक मुद्देपुसदची घटनापॉझिटिव्ह मृत शिक्षिकेच्या संपर्कात आले होते


लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : होम क्वारंटाईन असलेल्या एका कम्पाऊंडरने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. येथील श्रीरामपूर परिसरात गुरुवारी दुपारी १२.३० वाजता ही घटना उघडकीस आली. नानाराव फकीरजी कदम (६५) रा. पंचवटी हनुमान मंदिरजवळ श्रीरामपूर असे मृताचे नाव आहे.
नानाराव कदम हे एका खासगी डॉक्टरकडे कम्पाऊंडर म्हणून कार्यरत होते. याच परिसरातील एका कोरोना पॉझिटिव्ह शिक्षिकेचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाला. मृत्यूच्या दोन दिवसापूर्वी ही शिक्षिका नानाराव कार्यरत असलेल्या खासगी दवाखान्यात गेली होती. त्यामुळे तेथील डॉक्टर व कम्पाऊंडर यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान कदम यांनी गुरुवारी आत्महत्या केली. वसंतनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. कदम यांच्या पश्चात पत्नी कमलाबाई, गणेश, उमेश व सतीश ही तीन मुले, भाऊ सुरेश कदम व मोठा आप्त परिवार आहे.

 

 

Web Title: Suicide of a quarantine compounder in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.