‘वायपीएस’मध्ये ग्रीष्मकालीन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 09:27 PM2019-03-25T21:27:47+5:302019-03-25T21:28:08+5:30
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये नि:शुल्क ग्रीष्मकालीन शिबिर घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी आनंद घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये नि:शुल्क ग्रीष्मकालीन शिबिर घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी आनंद घेतला.
कार्यानुभव शिबिरात विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी शिकण्याची संधी देण्यात आली. परीक्षा संपल्यानंतर घरच्या घरी काही नवीन वस्तू कशा तयार करता येईल, याविषयीचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले. माती, रांगोळी, सुईधागा, मेहंदी आदी वस्तूंचा उपयोग कशा-कशा प्रकारे केला जाऊ शकतो याविषयीचे धडे त्यांना देण्यात आले. या कला शिकण्यासाठी काही ठिकाणी पैसे मोजावे लागते. यवतमाळ पब्लिक स्कूलने मात्र कुठलेही शुल्क घेतले नाही.
शिबिरामध्ये पहिली ते पाचवीच्या जवळपास ३८५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. चित्रकला, नृत्य, संगीत, विविध खेळ आदी बाबींवरही सप्रात्यक्षिक मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य डॉ. जेकब दास यांच्या मार्गदर्शनात शिबिर घेण्यात आले. यासाठी वर्षा फुटाणे, अदिती भिष्म, मंजू साहू, विद्या वावरकर, राधिका जयस्वाल, प्रीती लाखकर यांचेही सहकार्य लाभले.