रविवारचा बाजार चोरांना पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 09:46 PM2019-06-30T21:46:13+5:302019-06-30T21:46:33+5:30

शहरातील रविवारचा बाजार चोरट्यासाठी पर्वणी ठरत आहे. मागच्या रविवारी आठवडी बाजार व दत्तचौक भाजी मार्केटमधून पाच जणांचे मोबाईल लंपास झाले होते. त्यानंतर थेट जिल्हा वाहतूक शाखेतून पोलीस जमादाराचा मोबाईल लंपास झाला. पोलिसांकडून कोणतीच कारवाई न झाल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले आहे.

Sundays market sticks to the thieves | रविवारचा बाजार चोरांना पर्वणी

रविवारचा बाजार चोरांना पर्वणी

Next
ठळक मुद्देदिवसभरात उडविले दहा मोबाईल : मागील रविवारीही पाच चोरले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील रविवारचा बाजार चोरट्यासाठी पर्वणी ठरत आहे. मागच्या रविवारी आठवडी बाजार व दत्तचौक भाजी मार्केटमधून पाच जणांचे मोबाईल लंपास झाले होते. त्यानंतर थेट जिल्हा वाहतूक शाखेतून पोलीस जमादाराचा मोबाईल लंपास झाला. पोलिसांकडून कोणतीच कारवाई न झाल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले आहे. रविवार ३० जूनला भरलेल्या बाजारातून एकाच वेळी दहा मोबाईल चोरट्यांनी लंपास केले आहेत. अवधुतवाडी पोलीस ठाण्यात चार तक्रारी आल्या. तर शहर ठाण्यामध्ये सहा तक्रारी आल्या आहेत.
पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरटे आपला हात साफ करत आहे. पोलीस केवळ गुन्हे दाखल करण्यापलिकडे कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. यामुळेच आता गर्दीच्या ठिकाणी मोबाईल वापरायचा की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शहर ठाण्याच्या हद्दीतील विठ्ठलवाडी भाजी मार्केटमधून एकाच वेळी सहा जणांचे ६६ हजार ९९९ रुपये किंमतीचे मोबाईल चोरट्याने लंपास केले. शर्टच्या अथवा पॅन्टच्या खिशातून मोबाईल काढले जात आहे. भाजी मार्केटमध्ये गर्दी होत असल्याचा फायदा चोरटे घेत आहेत. या प्रकरणी शहर पोलिसांनी ६ स्वतंत्र तक्रारी नोंदविण्याऐवजी एकच सामूहिक तक्रार नोंदवून तीव्रता कमी दाखविण्याचा प्रयत्न केला. देवीदास विठ्ठल बढीये (४५) रा. शिरे ले-आऊट यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द सहा मोबाईल चोरल्याचा गुन्हा नोंदविला. अवधुतवाडी पोलीस ठाण्यात वृत्तलिहीपर्यंत गुन्हाच नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. तक्रार घेऊन आलेल्यांवरच प्रश्नाची सरबत्ती करून भंडावून सोडले जाते. आरोपीचा शोध घेण्याऐवजी फिर्यादीचीच उलट चौकशीचा प्रकार सुरू आहे.
एलसीबी, विशेष पथक कुचकामी
अवधुतवाडी ठाण्यातील पथक केवळ फिक्स पॉर्इंट राखण्यापुरतेच मर्यादित आहे. त्यामुळे एकही डिटेक्शन येथे झाले नाही. या ठाण्याचा कारभार सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांकडूनही कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. इतकेच नव्हे तर डिटेक्शन मास्टर अशी शेखी मिरवणारे विविध पथकही कुचकामी ठरत आहे. एलसीबीत फेरबदल झाले असून यवतमाळ शहराची जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्याकडे सोपवली आहे. या अधिकाºयापुढे मोबाईल चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे.

Web Title: Sundays market sticks to the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.