सुनील धोराजीवाला यांची उपवास तपस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 09:47 PM2018-09-10T21:47:39+5:302018-09-10T21:47:55+5:30
येथील सुनील बचुभाई धोराजीवाला यांनी ३० दिवसांची उपवासाची कठीण तपस्या केली आहे. या मासक्षमण तपस्येचा पचखान कार्यक्रम मंगळवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता येथील सुमतीनाथ जैन मंदिरातील केशरिया भवनाच्या पद्मलक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील सुनील बचुभाई धोराजीवाला यांनी ३० दिवसांची उपवासाची कठीण तपस्या केली आहे. या मासक्षमण तपस्येचा पचखान कार्यक्रम मंगळवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता येथील सुमतीनाथ जैन मंदिरातील केशरिया भवनाच्या पद्मलक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
येथील चेतन धोराजीवाला स्विट्सचे संचालक सुनील यांनी वयाच्या आठ वर्षांपासून तपस्येला सुरुवात केली. अनेक एकसने-ब्यासने, एक व तीन उपवास केले. पुढे मोठ्या तपस्येत त्यांनी आठ व सोळा दिवसांचे उपवास केले. अत्यंत कठीण चौवीयार उपवास म्हणजे एकही दिवस पाणी न घेता अशी आठ दिवसांची तपस्याही त्यांनी केली आहे. धोराजीवाला परिवारात सुनील यांच्या पत्नी प्रमिता, रक्षा अतुल धोराजीवाला यांनी १६ उपवासाची तपस्या पूर्ण केली आहे.
वडील बचुभाई यांच्या निधनानंतर परिवारात धार्मिक संस्कार रूजवून ठेवण्याचे कार्य आई कंचनबेन यांनी केल्याचे सुनील यांनी सांगितले. मासक्षमण म्हणजे ३० उपवासाची उपलब्धी ही गर्वाची बाब मानली जाते. यवतमाळ सकल जैन समाजातर्फे सुनील यांना मानपत्राने गौरविले जाणार आहे.