आता महाविद्यालयांत आधार नोंदणी कॅम्प
By Admin | Published: July 22, 2016 02:00 AM2016-07-22T02:00:00+5:302016-07-22T02:00:00+5:30
जिल्ह्याातील जवळपास २० टक्के नागरिक आधार नोंदणीपासून वंचित असून अशा नागरिकांसाठी आता शाळांसोबत महाविद्यालयातही आधार कॅम्प लावण्यात येणार आहे.
२० टक्के वंचित : लाभ घेण्याचे आवाहन
यवतमाळ : जिल्ह्याातील जवळपास २० टक्के नागरिक आधार नोंदणीपासून वंचित असून अशा नागरिकांसाठी आता शाळांसोबत महाविद्यालयातही आधार कॅम्प लावण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसोबतच त्यांचे पालक व इतर नागरिकही या ठिकाणी जाऊन आधार कार्ड नोंदणी करू शकतील.
जिल्ह्यात गत सहा महिन्यांपासून आधार कॅम्प लावण्यात आले. त्यामुळे जवळपास ८२ टक्के आधार नोंदणी पूर्णत्वास आली आहे. परंतु अद्यापही १८ ते २० टक्के नागरिक आधार नोंदणीपासून दूर आहेत. अशा सर्व नागरिकांना आधार कार्ड योजनेत सामावून घेण्यासाठी पुन्हा एकदा शाळांसोबतच महाविद्यालयातही आधार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. शाळेने स्वत:च्या सोयीने तारीख ठरवून त्या दिवशी आधार शिबिर आपल्या शाळेत लावायचे आहे आणि त्यापूर्वी तशी सूचना विद्यार्थी व पालकांना द्यावयाची आहे.
आधार कार्ड काढण्यासाठी मतदान कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, बँकेचे पासबूक, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एखादे ओळखपत्र त्याशिवाय रहिवाशी दाखला म्हणून राशन कार्ड, वीज बील, मतदान कार्ड आणि वयाचा दाखला म्हणून टीसी, बोनाफाईड सर्टिफिकेट, जन्माचा दाखला आदी कागदपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे, असे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)