बेपत्ता पावसात बंधारा शेतकºयांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 10:15 PM2017-08-03T22:15:33+5:302017-08-03T22:16:27+5:30
गत महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंतेचे सावट पसरले आहे.
विवेक पांढरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
फुलसावंगी : गत महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंतेचे सावट पसरले आहे. बेपत्ता पावसात मात्र फुलसावंगीत जलयुक्त शिवार योजनेतून बांधलेला सिमेंट बंधारा मात्र तुडूंब भरला आहे. यामुळे परिसरातील विहिरींच्या पातळीत वाढ झाल्याने सिंचनाची सोय असलेले शेतकरी पिकांचे सिंचन करीत आहे. जलयुक्त शिवारचा हा बंधारा इतरही गावांसाठी प्रेरणादायी ठरावा असा आहे.
महागाव तालुक्यातील फुलसावंगी गावाजवळून नाला वाहतो. यावर जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिमेंट नाला बांधला आहे. तीन मीटर खोल आणि २१ मीटर रुंद असा हा बंधारा आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाने बंधाºयात २०० मीटरपर्यंत पाणी साचले आहे. गत महिनाभरापासून पाऊस समाधानकारक पडत नसल्याने तालुक्यातील पिके करपत आहे. शेतकºयांच्या चेहºयावर चिंतेचे सावट आहे. पावसासाठी जो-तो करूणा भाकत आहे. अशा बेपत्ता पावसाच्या दिवसात फुलसावंगीतील काही शेतकºयांना बंधाºयाने मोठा आधार दिला आहे.
या बंधाºयातील पाण्यामुळे भूगर्भातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. जवळपासच्या शेतकºयांच्या विहिरी व विंधन विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. ज्यांच्याकडे सिंचन सुविधा आहे असे शेतकरी सिंचन करीत आहे. त्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला
फुलसावंगीनजीक सिमेंट बंधारा बांधला आहे. बंधाºयामुळे गावातील सार्वजनिक व खासगी विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे गावातील पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी सुटला आहे. शासनाकडून राबविण्यात येणाºया जलयुक्त शिवार अभियानाचे हे फलित असल्याचे गावकरी सांगत आहे.