पुसदमध्ये आजपासून सर्जिकल बँक रुग्णसेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:27 AM2021-07-08T04:27:42+5:302021-07-08T04:27:42+5:30

उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांच्या हस्ते व महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. आशिष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ...

Surgical bank in Pusad from today | पुसदमध्ये आजपासून सर्जिकल बँक रुग्णसेवेत

पुसदमध्ये आजपासून सर्जिकल बँक रुग्णसेवेत

Next

उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांच्या हस्ते व महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. आशिष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बँकेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसीलदार अशोक गीते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ही सर्जिकल बँक सर्व साहित्यासह ८ जुलैपासून रुग्णसेवेत कार्यान्वित होत आहे.

८ ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर, ५ फोल्डिंग बेड, ५ व्हीलचेअर, ५ एअर बेड, ५ वॉकर, ५ क्रचेस (कुबड्या), ३ आयव्ही स्टॅन्ड, ३ कमोड चेअर, ३ ट्रेक्शन किट, २५ कॅटल, २५ वेपोरायझर, १० आयआर थर्मामीटर, १० ऑक्सिमीटर, ५ नेबुलायझर अशा रुग्णांना आवश्यक असलेल्या साहित्यांचा सर्जिकल बँकेत समावेश आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर घरी आलेल्या रुग्णांना तसेच अन्य आजारांच्या रुग्णांना सर्जिकल बँकेतील साहित्य उपयोगी पडू शकते. बँकेतील साहित्य पूर्णतः नि:शुल्क मिळणार आहे. वापर झाल्यानंतर ते साहित्य परत जमा करावे लागणार आहे. गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन भारती मैंद नागरी पतसंस्था सामाजिक उपक्रम समितीचे अध्यक्ष शरद मैंद यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शरद मैंद, अनुकूल चव्हाण, ललित सेता, सूरज डुबेवार, कौस्तुभ धुमाळे, महेश बजाज, अमोल व्हडगिरे, ऋषिकेश देशपांडे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Surgical bank in Pusad from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.