निलंबित वाहक चक्क कामगिरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 05:00 AM2020-06-15T05:00:00+5:302020-06-15T05:00:06+5:30

वाहतूक निरीक्षकाचा बेजबाबदारपणा याठिकाणी कारणीभूत ठरला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सारवासारव सुरू झाली. लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांवर याचे खापर फोडण्याची तयारी सुरू आहे. पातुरकर यांनी कामगिरी बजावल्याचे अनेक पुरावे सोडले आहे. लॉगशिट आणि फेरी करून आल्यावर पैशाचा हिशेबही त्यांच्याच नावावर मांडण्यात आला आहे.

Suspended conductor on duty | निलंबित वाहक चक्क कामगिरीवर

निलंबित वाहक चक्क कामगिरीवर

Next
ठळक मुद्देएसटीचा यवतमाळ आगार : राळेगावची फेरी केली, बेजबाबदारपणाचा कळस

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निलंबित वाहकाला चक्क कामगिरीवर पाठविण्याचा प्रताप एसटीच्या यवतमाळ आगाराने केला. गेली कित्येक वर्षांच्या कालावधीतील हा पहिलाच प्रकार असल्याने एसटीच्या वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
विभागाच्या बेजबाबदारपणाची अनेक प्रकरणे पुढे येत असतानाच यवतमाळ आगारात घडलेल्या या प्रकाराने त्यात भर पडली आहे. अमर पातुरकर या वाहकावर ९ मार्च २०२० रोजीच्या आदेशाने (क्र.४९३) निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यानच्या काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्याने वाहतूक थांबली. नियम पाळून प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविणे सुरू झाले. यात पातुरकरचाही समावेश होता. निलंबित असताना त्यांना २५ मे २०२० रोजी कामावर बोलविण्यात आले, राळेगाव फेरीवरही पाठविले. तोपर्यंत आगार पातळीवरील वरिष्ठांना याची खबरही नव्हती. वाहतूक निरीक्षकाचा बेजबाबदारपणा याठिकाणी कारणीभूत ठरला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सारवासारव सुरू झाली. लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांवर याचे खापर फोडण्याची तयारी सुरू आहे. पातुरकर यांनी कामगिरी बजावल्याचे अनेक पुरावे सोडले आहे. लॉगशिट आणि फेरी करून आल्यावर पैशाचा हिशेबही त्यांच्याच नावावर मांडण्यात आला आहे. यवतमाळ आगारात मर्यादेपेक्षा अधिक संख्येने पर्यवेक्षकांचा वापर आहे. तरीही होत असलेल्या चुका बेजबाबदारपणाचा कळस गाठणाऱ्या आहे. विभागनियंत्रक शिस्तप्रिय आणि कर्तव्यतत्पर आहे. त्यामुळे सदर प्रकरणात कारवाई होईल, असे कर्मचारी वर्गातून ठामपणे सांगितले जात आहे.

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
निलंबित कर्मचाऱ्याला कामगिरीवर पाठविण्याचे प्रकरण आगार पातळीवर दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाहतूक निरीक्षकाकडून झालेल्या चुकीबद्दल सामान्य कामगाराला अडकवण्याचे प्रयत्न केले जात आहे. संबंधित वाहकाचे निलंबन त्याने केलेल्या कामगिरीच्या दिवसापासून उठविण्याचे यावे आणि वाहतूक निरीक्षकावर कारवाई करण्यात मागणी संघटनेतर्फे एसटी प्रशासनाकडे करण्यात आली आहे, असे एसटी कामगार संघटनेचे यवतमाळ विभागीय सचिव राहुल धार्मिक यांनी कळविले आहे.

Web Title: Suspended conductor on duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.