शंकेखोर प्रियकराने केला प्रेयसीचा घात; २४ तासात हुडकून ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2023 07:34 PM2023-05-30T19:34:20+5:302023-05-30T19:34:54+5:30

Yawatmal News प्रेयसीने प्रेमात धोका दिला, या भावनेने संतप्त झालेल्या शंकेखोर प्रियकरानेच त्याच्या प्रेयसीचा खून केल्याची बाब तपासात उघड झाली आहे.

Suspicious lover ambushes girlfriend; Within 24 hours, the shackles were broken | शंकेखोर प्रियकराने केला प्रेयसीचा घात; २४ तासात हुडकून ठोकल्या बेड्या

शंकेखोर प्रियकराने केला प्रेयसीचा घात; २४ तासात हुडकून ठोकल्या बेड्या

googlenewsNext

यवतमाळ : प्रेयसीने प्रेमात धोका दिला, या भावनेने संतप्त झालेल्या शंकेखोर प्रियकरानेच त्याच्या प्रेयसीचा खून केल्याची बाब तपासात उघड झाली आहे. वणी शहरातील जैन ले-आउट परिसरात सोमवारी सकाळी या तरुणीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता. वणी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकरणाच्या तपासाला गती दिली आणि २४ तासांच्या आत हिंगोली जिल्ह्यातील शिरोळी (ता. वसमत) येथे जाऊन आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या.


विनोद रंगराव शितोळे (२५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मृत प्रिया रेवानंद बागेसर ऊर्फ आरोही वानखेडे (२५) ही मूळची वरोरा येथील रहिवासी आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ती वणीतील जैन ले-आउटमधील कृष्णा अपार्टमेन्टमधील पहिल्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये किरायाने राहत होती. सोमवारी सकाळी या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती फ्लॅटचे मालक राकेश डुबे यांनी पोलिसांना दिली. पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यावेळी फ्लॅटच्या दाराचा कोंडा बाहेरून लावून होता. दार उघडून आत बघितले असता, प्रियाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत जमिनीवर पडून होता. तिच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा होत्या. हा खूनच असल्याची शंका पोलिसांना आल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला.

केवळ नावावरून लावला आरोपीचा छडा
वणी पोलिसांना तपासात समजले की, विनोद नामक तरुणाशी प्रियाचे प्रेमसंबंध होते. खून करून तो गावाकडे पसार झाला. संशयित आरोपीचे नावही माहीत नसताना वणीचे ठाणेदार प्रदीप सिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक माधव शिंदे, त्यांचे सहकारी अमोल अन्नेवार, सागर सिडाम यांनी बुद्धिकौशल्याचा वापर करीत आरोपी प्रियकर विनोद शितोळे याला हिंगोली जिल्ह्यातील शिरोळी गावातून अटक केली. त्याने पोलिसांपुढे गुन्ह्याची कबुली दिली आहे.

फेसबुकवरून फुलले प्रेम

मृत प्रिया व विनोद या दोघांची मैत्री फेसबुकवर झाली. कालांतराने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तो तिला भेटण्यासाठी नेहमीच वणीत येत असे. विनोद स्वभावाने शंकेखोर होता. प्रियाचे अन्य कुणाशी प्रेमसंबंध असल्याची त्याला शंका होती. घटनेच्या दिवशी याच मुद्द्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात विनोदने प्रियाचा खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. तिचा खून करण्यासाठी नेमके कोणते हत्यार वापरले, हे मात्र तपासाचा भाग असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Web Title: Suspicious lover ambushes girlfriend; Within 24 hours, the shackles were broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.