बोथबोडनमध्ये मुख्यमंत्र्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

By admin | Published: July 2, 2017 01:26 AM2017-07-02T01:26:51+5:302017-07-02T01:26:51+5:30

शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटींमुळे १५ टक्केच शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

The symbolic funeral of the Chief Minister at Boththebodan | बोथबोडनमध्ये मुख्यमंत्र्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

बोथबोडनमध्ये मुख्यमंत्र्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

Next

कर्जमाफी : शेतकरी विधवांचे अभिनव आंदोलन, नेरमध्ये नोंदविला निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटींमुळे १५ टक्केच शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शासनाच्या या आदेशाचा निषेध म्हणून बोथबोडण येथील शेतकरी विधवांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून संताप व्यक्त केला. शासनाने सरसकट कर्जमाफी दिली नाही, यापेक्षाही उग्र आंदोलनाचा निर्धार त्यांनी केला.
जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव म्हणून देशपातळीवर बोथबोडणची ओळख आहे. अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी, समाजसेवी संस्थांनी या गावाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. काहींनी गावात विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे प्रयत्न केले आहे. मात्र या गावाची स्थिती अद्याप सुधारली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्ज माफ करतील, अशी अपेक्षा तेथील शेतकरी विधवांना होती. तथापि शासनाने कर्जमाफीत घातलेल्या जाचक अटींमुळे या शेतकरी विधवांना कोणताच लाभ झाला नाही. त्याचा संताप म्हणून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गावातून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. या आंदोलनात संपूर्ण गाव सहभागी झाले.
शेतकरी विधवा नाझीबाई राठोड यांनी हाती आगटं धरलं, तर शांताबाई वरणकर, चंद्रकला शेळके, सुंदरबाई चव्हाण, लिलाबाई पुरी, देवकाबाई जाधव, अनुसया देवकर आदींनी प्रतिकात्मक प्रेतयात्रेत खांदा दिला. यावेळी शासनविरोधी निदर्शने करण्यात आली. अनुप चव्हाण, रोहित राठोड, जितेंद्र राठोड, श्याम राठोड, दत्ता राठोड, अनिल राठोड, सत्यम जाधव यांच्या पुढाकारात आंदोलन करण्यात आले. शेतकरी विधवा व ग्रामस्थ मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी होते. संपूर्ण गावातून अंत्ययात्रा फिरल्यानंतर शेवटी स्मशानभूमीजवळ अंत्यविधी करण्यात आला. शासनाने सरसकट कर्जमाफीची घोषणा केली नाही, तर पालकमंत्र्यांच्या घरापुढे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी विधवांनी दिला.

कर्जमाफीच्या ‘जीआर’ची होळी
नेर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहायचे. त्यांचे राज्य रयतेसाठी होते. मात्र महाराष्ट्र सरकार महाराजांचे नाव घेवून शेतकऱ्यांना फसवत आहे, असे सांगून कर्जमाफीसंदर्भात काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची येथे होळी करण्यात आली. युवा शेतकरी संघर्ष समितीने दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून निषेध नोंदविला. कर्जमाफी अत्यंत फसवी आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्या गेली. शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा निर्णय घेण्यात आला. शासन बोगस, जीआर बोगस अशा घोषणा देत जीआरची होळी करण्यात आली. यावेळी गोपाल चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य निखिल पाटील जैत, संतोष अरसोड, सतीश चवात, मुकुंद गावंडे, गौरव नाईकर, रवी गाडे, पुरुषोत्तम राठोड, सदानंद पेचे, स्वप्नील शेटे, मिथून अलाटे, मिथून भगत, विशाल चहाकार, राजू भोयर, सुदाम राठोड, गजानन दहेलकर, विजय राठोड, गणेश ठाकरे, गोपाल खडसे आदी उपस्थित होते.

 

Web Title: The symbolic funeral of the Chief Minister at Boththebodan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.