कुष्ठरोग निर्मूलनासाठी यंत्रणा सरसावली
By Admin | Published: August 18, 2016 01:16 AM2016-08-18T01:16:55+5:302016-08-18T01:16:55+5:30
कुष्ठरोगाला हद्दपार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सरसावली आहे. त्यासाठी जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविला जात आहे.
यवतमाळ : कुष्ठरोगाला हद्दपार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सरसावली आहे. त्यासाठी जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविला जात आहे.
जिल्ह्यात सतत कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविला जातो. सध्या आरोग्य यंत्रणेने गेल्या जूनपर्यंत जिल्ह्यात एकूण ८२ नवीन कुष्ठ रूग्ण शोधले आहे. यात ३६ महिलांचा समावेश आहे. नवीन कुष्ठ रूग्णांमध्ये ६0 श्वास रूग्ण आहेत. नवीन रूग्णांमध्ये मुलांची संख्या पाच आहे. यापैकी विकृतीचे रूग्ण मात्र केवळ तीनच आहे. आत्तापर्यंत तब्बल ७६ कुष्ठ रूग्ण औषधोपचारमुक्त झाले आहेत. या सर्वांची गोळाबेरीज केली असता सध्या जिल्ह्यात एकूण २५९ क्रियाशील कुष्ठ रूग्ण आहेत.
कुष्ठ रूग्णांना औषधोपचारमुक्त करण्यासाठी कुष्ठरोग सहायक संचालक कार्यालयातर्फे जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविला जात आहे. यात नवीन रूग्णांचा सतत शोध घेण्यात येत आहे. त्यांना संदर्भ सेवा देण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे. परिणामी नवीन कुष्ठ रूग्णांचा दर घसरला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती सभेतही कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आली आहे. आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे दर महिन्याला या कार्यक्रमाचा आढावा घेत आहे. (शहर प्रतिनिधी)