नेर तालुक्यात पाण्यासाठी टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 10:15 PM2017-12-15T22:15:54+5:302017-12-15T22:17:52+5:30

तालुक्यात आतापासूनच पाणीप्रश्न तापला आहे. अशातच पंचायत समितीने कृती आराखडा नाममात्र बनविल्याने पाणी समस्या अधिक गंभीर होणार असल्याची चिन्हे दिसत आहे.

Taha to water in Ner taluka | नेर तालुक्यात पाण्यासाठी टाहो

नेर तालुक्यात पाण्यासाठी टाहो

Next
ठळक मुद्दे३८ गावांना पाणीटंचाईच्या झळा : मंजूर कृतीआराखडा नाममात्र असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : तालुक्यात आतापासूनच पाणीप्रश्न तापला आहे. अशातच पंचायत समितीने कृती आराखडा नाममात्र बनविल्याने पाणी समस्या अधिक गंभीर होणार असल्याची चिन्हे दिसत आहे. ३८ गावातील नागरिक आतापासूनच पाणी टंचाईच्या झळा सोसत आहे.
मंजूर आराखड्यात उपाययोजनांचे टप्पेच अधिक पाडण्यात आलेले आहेत. विहीर अधिग्रहणात परजना, शहापूर, चिचगाव पिंपरी (ईजारा), पेंढारा याच गावांचा समावेश करण्यात आला. प्रत्यक्षात आंजती, मांगलादेवी, चिकणी डोमगा, पिंपळगाव काळे याशिवाय इतर गावात विहीर अधिग्रहणाची गरज आहे.
टँकरने पाणीपुरवठ्यासाठी चिचगाव, पिंप्री इजारा, पेंढारा या गावांचा समावेश आहे. आजंती, चिकणी, मांगलादेवी यासह इतर २० गावे तहानलेली आहेत. तात्पुरती पुरक नळयोजनेत बाणगाव, बोंडगव्हान, मांगलादेवी, रत्नापूर, सिंदखेड, परजना गावांचा समावेश आहे. मुळात परजना येथे विहीर आहे. मात्र पाईपलाईन नसल्यावर तात्पुरती कोणती योजना प्रशासन करणार हा प्रश्न आहे. नळयोजना आहे, पण पाणी नाही अशी या गावाची अवस्था आहे.
दरवर्षी नळयोजना विशेष दुरुस्तीच्या नावाने कृतीआराखडा तयार केला जातो. मात्र कायस्वरूपी दुरुस्ती कधी झाली नाही. हा निधी जातो कुठे हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. धनज, पिंपळगाव (डुब्बा), सोनखास, उत्तरवाढोणा, वटफळी या गावांचा समावेश विशेष दुरुस्तीमध्ये आहे. अनेकदा आराखडे तयार झाले, प्रत्यक्षात दुरुस्ती झालेली नाही.
खासगी विहीर अधिग्रहणासाठी पिंपळगाव काळे, बोरगाव, चिकणी डोमगा, चिखली कान्होबा, दहीफळ, धनज, दोनद खुर्द, रामगाव, जवळगाव, सारंगपूर, कोव्हळा, बोदगव्हान, खरडगाव, मालखेड (बु), मालखेड (खुर्द), मंगरूळ, सांवगा, शेंद्री (खुर्द), शिरजगाव, उत्तरवाढोणा, वाई, पारस, वटफळी आदी गावांचा समावेश कृती आराखड्यात करण्यात आला. या गावात कायमस्वरूपी योजनांची गरज आहे. परंतु याकडे गांर्भियाने कुणीही लक्ष देताना दिसत नाही.
भीषणता कमी दाखविण्याचा खटाटोप
नेर तालुक्यात आतापासूनच पाणीप्रश्न भीषण झाला आहे. प्रशासनाकडून मात्र टप्प्या टप्प्याने उपायांची आखणी कृती आराखड्यात करण्यात आली आहे. भीषणता लपविण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचे बोलले जाते. एनवेळी केल्या जाणाºया उपाययोजना लोकांसाठी त्रासाच्या ठरणाºया आहेत. प्रत्यक्ष पाणीटंचाई असलेली गावेच कृती आराखड्यात नसल्याने ही शक्यता अधिक आहे.

Web Title: Taha to water in Ner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.