उमरखेड तहसीलदारांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:42 AM2021-03-26T04:42:14+5:302021-03-26T04:42:14+5:30
तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी अधिनस्थ मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांसोबतच कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र, सभागृहात सामाजिक ...
तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी अधिनस्थ मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांसोबतच कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र, सभागृहात सामाजिक अंतर पाळण्यात आले नव्हते. अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्कसुद्धा नव्हते. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. दररोज सायंकाळी ५ ते सकाळी ९ पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी पाचहून अधिक व्यक्तींसाठी जमावबंदी आदेश दिले आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आहेत. त्या आदेशाला केराची टोपली दाखवत खुद्द तालुका दंडाधिकाऱ्यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि बैठकीला उपस्थित सर्वांची कोरोना चाचणी करून घ्यावी, अशा आशयाचे निवेदन भाऊ अंबाजोगाईकर, शेख निसार शेख इब्राहिम, सय्यद फारुख सय्यद दाऊद यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.