कोरोनाबाबत ठोस उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:40 AM2021-04-15T04:40:15+5:302021-04-15T04:40:15+5:30
हिंगोली, नांदेड आणि यवतमाळचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी, संपूर्ण यंत्रणा, पोलीस प्रशासन अहोरात्र कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. ...
हिंगोली, नांदेड आणि यवतमाळचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी, संपूर्ण यंत्रणा, पोलीस प्रशासन अहोरात्र कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, प्रशासनाची तयारी अपुरी पडत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भयाचे वातावरण पसरले आहे.
या स्थितीत अनेकजण खोट्या बातम्या आणि अपप्रचारही करीत आहे. या पार्श्वभूमीवर वसमत येथे ऑक्सिजन बेडची ५० खाटांची व्यवस्था, किनवट, हदगाव येथे ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव अभिमन्यू काळे यांच्याकडे नांदेड, हिंगोली व यवतमाळ या शेवटच्या टोकाला असलेल्या जिल्ह्यांना जादा कोटा देण्याची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे.
बॉक्स
नागरिकांनी घाबरू नये
कुणीही कोरोना पॉझिटिव्ह आल्यास घाबरून जाऊ नका, असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे. रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या साठेबाजांवर कारवाई करण्यासंदर्भात अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.