सावकाराने हडपलेल्या शेतीचा महिलेला ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 11:57 PM2017-09-15T23:57:06+5:302017-09-15T23:57:28+5:30

अवैध सावकाराने हडपलेल्या शेतजमिनीसाठी एका विधवेने केलेल्या सहा वर्षाच्या संघर्षाला यश आले.

Take control of the land owned by the lender | सावकाराने हडपलेल्या शेतीचा महिलेला ताबा

सावकाराने हडपलेल्या शेतीचा महिलेला ताबा

Next
ठळक मुद्देसहा वर्षे संघर्ष : उमरखेड तालुक्यातील पिरंजीचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : अवैध सावकाराने हडपलेल्या शेतजमिनीसाठी एका विधवेने केलेल्या सहा वर्षाच्या संघर्षाला यश आले. सावकाराने हडपलेली उमरखेड तालुक्यातील पिरंजी येथील चार हेक्टर शेती सहाय्यक निबंधकांच्या पुढाकाराने सदर महिलेला देण्यात आली.
उमरखेड तालुक्यातील पिरंजी येथील परसराम लांभाडे यांनी याच गावातील शेषराव भागोराव भिसे यांच्याकडून खंडपट्टा ९९ वर्षाचा करून दिला. त्याचा बोबदला ३९ हजार रुपये घेतला होता. परंतु ही जमीन चार हेक्टर १२ आर. भोगवटा क्र. २ ची असल्याने त्याची खरेदी झाली नाही. त्याच दरम्यान परसराम लांभाटे यांचे निधन झाले. संपूर्ण घराची जबाबदारी पत्नी कुसूम लांभाटे यांच्यावर आली. दोन लहान मुलांचे संगोपन करण्यासाठी काहीच नव्हते. पतीचे निधन आणि अवैध सावकाराने हडप केलेली जमीन यामुळे तिच्यावर मोठे संकट आले होते. यासाठी संघर्ष करण्याची खूनगाठ तिने बांधली.
सावकाराचे सहाय्यक निबंधक कार्यालयात त्यांनी २६ आक्टोबर २०१५ रोजी दस्तवेजाचे पुरावे सादर केले. घटनाक्रमाची माहिती घेतली. त्याची गंभीर दखल सावकाराचे सहाय्यक निबंधक सुनील भालेराव यांनी घेतली.
दोन वर्ष चौकशी करण्यात आली. चौकशी अंती सावकार शेषराव भीसे यांनी शेती हडप केल्याचे सिद्ध झाले. त्याचा अहवाल सावाकरांचे निबंधक यवतमाळ कार्यालयाला सादर केला. तयावर गौतम वर्धन यांनी या प्रकरणाची चौकशी करून जमीन अवैध सावकारीत प्राप्त झाल्याचा निर्वाळा दिला. तसेच कुसूम परसराम लाभाटे यांना सदर जमीन परत करण्याचा आदेश दिला.
या आदेशानुसार गुरूवार १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पिरंजी येथे जाऊन या जमिनीचा ताबा देण्यात आला. त्यावेळी सहाय्यक निबंधक सुनील भालेराव, ए.डी. भागानगरे, द.वी. नरवाडे, एम.जी. गायकवाड, तलाठी एस.व्ही. मोटाळे, हर्षवर्धन मुनेश्वर, रूपाली नेवारे, दीपाली सयाम उपस्थित होते. कुसुम लाभाटे यांना ताबा पत्रक सुपूर्द करण्यात आले. तब्बल सहा वर्षाच्या संघर्षाने एका विधवेला आपले शेत परत मिळाले.

उमरखेड तालुक्यात अवैध सावकारी करत असेल किंवा कुणाची जमीन हडप केली असेल तर त्याची तक्रार सहाय्यक निबंधक कार्यालयात द्यावी. कार्यालय त्यांच्या पाठीशी उभे राहून न्याय देणार आहे. कुसूम लांभाटे यांना १० एकर १२ आर. जमीन अशाच प्रकरणात परत देण्यात आली.
- सुनील भालेराव,
सहाय्यक निबंधक.

Web Title: Take control of the land owned by the lender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.