अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:38 AM2021-04-12T04:38:13+5:302021-04-12T04:38:13+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून भोसा व दहीसावळी घटावरुन मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच ...
गेल्या अनेक दिवसांपासून भोसा व दहीसावळी घटावरुन मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच तहसीलदारांनी एक पत्र काढून संबंधित तलाठी, मंडळ आधिकाऱ्यांना अवैध रेतीच्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. रेती तस्करांवर फौजदारी कारवाईचे आदेशसुध्दा दिले. त्यामुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.
तलाठी व मंडळ आधिकाऱ्यांना सर्व माहिती असताना अर्थपूर्ण मैत्री साधून ते गप्प बसले आहे. मात्र, आता कारवाई करणे बंधनकारक झाले आहे. अवैध रेती उपसा आणि वाहतुकीवर कारवाई करणे प्रत्येक तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे मंडळ अधिकारी व तलठ्यांना पत्र देणे म्हणजे कारवाई कुठे तरी पाणी मुरत असल्याचे सिद्ध होते.
बॉक्स
कारवाई न केल्यास जाब विचारणार
तहसीलदारांनी पत्र देऊनही मंडळ आधिकारी, तलाठ्यांनी कर्तव्यात कसूर केल्यास त्यांना जाब विचारला जाणर आहे. त्यांच्याविरूध्द जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईच प्रस्ताव पाठविला जाणार आहे. रेती तस्करीबाबत गटविकास अधिकारी, ठाणेदार, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनासुद्धा सूचनापत्र देऊन तहसीलदारांनी कारवाईबद्दल विचारणा केली होती. रेती घाटावर १४४ कलम लागू केल्यामुळे सध्या ही जबाबदारी पोलिसांचीच असल्याचे तहसीलदार नामदेव इसळकर यांनी सांगितले.