डोक्यावर टोपले अन् हातात कुदळ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:25 PM2018-04-28T23:25:27+5:302018-04-28T23:25:27+5:30

प्रत्येक गावात आज पाणीटंचाई आहे. गाव टँकरमुक्त करायचे असेल तर प्रत्येकाने डोक्यावर टोपले आणि हातात कुदळ घ्यायला हवी, असा सल्ला खासदार भावना गवळी यांनी दिला. अकोलाबाजार येथे श्रमदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

Take the head in the basket and take the spider in your hand | डोक्यावर टोपले अन् हातात कुदळ घ्या

डोक्यावर टोपले अन् हातात कुदळ घ्या

googlenewsNext
ठळक मुद्देभावना गवळी : टँकरमुक्तीसाठी अकोलाबाजार येथे श्रमदान

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रत्येक गावात आज पाणीटंचाई आहे. गाव टँकरमुक्त करायचे असेल तर प्रत्येकाने डोक्यावर टोपले आणि हातात कुदळ घ्यायला हवी, असा सल्ला खासदार भावना गवळी यांनी दिला. अकोलाबाजार येथे श्रमदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
अकोलाबाजार हे गाव खासदार भावना गवळी यांनी दत्तक घेतले आहे. त्यांनी गावकऱ्यांसोबत श्रमदान केले. दिलीप पामपट्टीवार यांच्या शेतात ग्रेडेड बंडींग खोदण्यात आले. पाणी फाऊंडेशनतर्फे वॉटर कप स्पर्धा घेतली जात आहे. यात अकोलाबाजार हे गावही सहभागी झाले आहे. त्याअनुषंगाने या ठिकाणी जलसंवर्धनाची कामे केली जात आहे.
गावात श्रमदान केल्याबद्दल खासदार भावना गवळी यांचा शाल व श्रीफळ देऊन गावकऱ्यांनी सत्कार केला. डॉ.संजीव जोशी यांनी आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार सचिन शेजाळ, कृषी विकास अधिकारी वानखडे आदींनी मार्गदर्शन केले.
श्रमदान कार्यक्रमात सरपंच अर्चना मोगरे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, जलयुक्त शिवारचे तज्ज्ञ सदस्य प्रवीण पांडे, उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, किशोर इंगळे, गजानन पाटील, योगेश वर्मा, राजू धोटे, अनुप चव्हाण, राजू मादेशवार, अयूब पठाण, डॉ.बेग, चंद्रकांत नांगलिया, उपसरपंच दयानंद अवथरे, प्रवीण राठोड आदी उपस्थित होते.
अकोलाबाजार हे गाव टंचाईमुक्त करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न केले जात आहे. वॉटर कप स्पर्धेत या गावाने सहभाग नोंदवून या प्रयत्नाला गती दिली आहे. यासाठी गावकऱ्यांचाही मोठा सहभाग आहे.

Web Title: Take the head in the basket and take the spider in your hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.