सण-उत्सवात निवृत्त पोलिसांची सेवा घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 09:26 PM2019-03-11T21:26:06+5:302019-03-11T21:26:25+5:30
सेवानिवृत्त कर्मचारी हे पोलीस विभागाचाच भाग असून भविष्यात निवडणूक, सण-उत्सवातील बंदोबस्तासाठी त्यांची मदत घेतली जाईल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सेवानिवृत्त कर्मचारी हे पोलीस विभागाचाच भाग असून भविष्यात निवडणूक, सण-उत्सवातील बंदोबस्तासाठी त्यांची मदत घेतली जाईल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी केले.
महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कल्याणकारी असोसिएशनतर्फे सेवानिवृत्तांचा सत्कार सोहळा येथे सोमवारी घेण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून राज कुमार बोलत होते. सेवानिवृत्तांच्या कुठल्याही अडचणी तातडीने सोडविल्या जाईल, अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नागपूरचे सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक रमेश मेहता होते. सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक सुरेश सोने, सेवानिवृत्त उपअधीक्षक सदाशिवराव भालेराव, उपअधीक्षक चंदनसिंह बायस, दयाराम चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्तीनी कार्यरत कर्मचाऱ्यांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. संचालन कैलास राऊत यांनी केले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाब पंधरे, उपाध्यक्ष अरुण शुंकर, गणेश शेरे, कोषाध्यक्ष महेश कळसकर, सचिव पांडूरंग शेलारे, दयानंद बनसोडे, दीपक देशमुख, प्रल्हाद गवळी, गणपत गिनगुले, अकील देशमुख, गजानन गिरी, सुभाष वांढरे, विनायक सुरपाम, केशव निथळे, गोविंद चेटलेवार, कृष्णा बेदरकर, मधू चव्हाण आदी उपस्थित होते.
विना मानधन सेवा देणार -चंदनसिंह बायस
गणेशोत्सव, दुर्गोत्सव, अन्य सण-उत्सव आणि निवडणूक काळात पोलीस विभागाला बंदोबस्तासाठी सेवानिवृत्त पोलीस विना मानधन सेवा देतील अशी ग्वाही संघटनेच्यावतीने सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक चंदनसिंह बायस यांनी यावेळी दिली.