अत्याचारी युवकावर कठोर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:31 PM2018-12-07T23:31:26+5:302018-12-07T23:32:16+5:30

येथील मस्जिद वॉर्डातील रहिवासी शादाब उर्फ सोहेल गफ्फार पोसवाल या युवकाने एका अल्पवयीन युवतीवर गुरूवारी दुपारी स्वत:च्या घरात अत्याचार केला. या घटनेने मुस्लीम समाजबांधवात संताप व्यक्त केला जात असून सदर युवकाविरूद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील मुस्लिम समाजबांधवांनी केली आहे.

Take strict action against the atrocious youth | अत्याचारी युवकावर कठोर कारवाई करा

अत्याचारी युवकावर कठोर कारवाई करा

googlenewsNext
ठळक मुद्देमुस्लीम समाज बांधवांची मागणी : पांढरकवडा ठाणेदारांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : येथील मस्जिद वॉर्डातील रहिवासी शादाब उर्फ सोहेल गफ्फार पोसवाल या युवकाने एका अल्पवयीन युवतीवर गुरूवारी दुपारी स्वत:च्या घरात अत्याचार केला. या घटनेने मुस्लीम समाजबांधवात संताप व्यक्त केला जात असून सदर युवकाविरूद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील मुस्लिम समाजबांधवांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ठाणेदार शिवाजी बचाटे यांना निवेदन दिले आहे.
गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आरोपी शादाब उर्फ सोहेल गफ्फार पोसवाल याने एका अल्पवयीन मुलीला स्वत:च्या घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे मुस्लिम समाजाची अस्मिता मलीन होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा अन्य धर्मियांचा दृष्टीकोनही बदलू शकतो, असे निवेदनात नमूद केले आहे. या घटनेमुळे वॉर्डातील सर्व नागरिकांना मानसीक त्रास सहन करावा लागत आहे. शादाबने केलेल्या कृत्यामुळे वॉर्डातील मुलामुलींवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकारामुळे समाजात दूषित वातावरण निर्माण होऊन धार्मिक वातावरण खराब होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. निवेदनावर अजीज पोसवाल, इरफान पोसवाल, हफिज पोसवाल, जाकीर जहाँगीर पोसवाल, साजीद शरिफ, अनिल पोसवाल, सलिम बेग, शब्बीर बेगसह समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Take strict action against the atrocious youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.