यवतमाळ येथे तिरडी काढून राज्य शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 03:13 PM2018-01-25T15:13:59+5:302018-01-25T15:20:51+5:30

शेतक ऱ्यांच्या आत्महत्या होत असतानाही शासन धोरणात बदल करायला तयार नाही, मदत द्यायलाही तयार नाही याच्या निषेधार्थ बुधवारी यवतमाळात तिरडी यात्रा काढून शासनाचा निषेध करण्यात आला.

By taking out last procession to protest state government in Yavatmal | यवतमाळ येथे तिरडी काढून राज्य शासनाचा निषेध

यवतमाळ येथे तिरडी काढून राज्य शासनाचा निषेध

Next
ठळक मुद्देशेतक ऱ्यांच्या आत्महत्या होत असतानाही शासन धोरणात बदल करायला तयार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतक ऱ्यांच्या आत्महत्या होत असतानाही शासन धोरणात बदल करायला तयार नाही, मदत द्यायलाही तयार नाही याच्या निषेधार्थ बुधवारी यवतमाळात तिरडी यात्रा काढून शासनाचा निषेध करण्यात आला.
यवतमाळात गेल्या पाच दिवसांपासून शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात चक्रीधरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या सहाव्या दिवशी वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी शासनाची तिरडी काढली. ही तिरडी यात्रा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. तिरडीसमोर आदिवासी समाज बांधवांनी परंपरागत डफडे वाजवून शासनाचा निषेध नोंदविला. तिरडी यात्रेतील शेतकऱ्यांनी शासन विरोधी घोषणा दिल्या.
शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करुन निद्रस्त सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिरंगा चौकात यात्रेचा समारोप झाला. सहाव्या दिवशी आंदोलनात काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. त्यात अ‍ॅड. देविदास काळे, प्रवीण देशमुख, अ‍ॅड. राजू कासावार, नरेंद्र ठाकरे, मोरेश्वर ठाकरे, अनिल देरकर, राजू यल्टीवार, प्रकाश मॅकलवार, निलीमा काळे, शकुंतला वैद्य, पुरुषोत्तम आवारी, मारोती गौरकार, विवेक मांडवकर, शीतल पोटे, शरीफ कुरेशी आदींसह वणी विधानसभा क्षेत्रातील वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

Web Title: By taking out last procession to protest state government in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.