तालुका भाजपचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 06:00 AM2020-02-26T06:00:00+5:302020-02-26T06:00:05+5:30
भारतीय जनता पक्षातर्फे यवतमाळ तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या कारभारावर तीव्र रोष व्यक्त करून महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध नोंदविण्यात आला. यवतमाळातील धरणे कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, उद्धवराव येरमे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, सुमित बाजोरिया, ..........
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भारतीय जनता पक्षातर्फे यवतमाळ तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या कारभारावर तीव्र रोष व्यक्त करून महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध नोंदविण्यात आला.
यवतमाळातील धरणे कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, उद्धवराव येरमे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, सुमित बाजोरिया, जगदीश वाधवाणी, प्रा.डॉ. प्रवीण प्रजापती, अजय राऊत, जिल्हा परिषद सदस्य रेणूताई शिंदे, नगरसेवक दत्ता कुलकर्णी, श्याम मॅडमवार, दिनेश चिंडाले, संजय शिंदे पाटील, जितेंद्र वायदंडे, मुन्ना दुबे, हेमंत दायमा, मोहन देशमुख, मनोज मुधोळकर, विनोद शिंदे, सुषमा राऊत, शुभांगी हातगावकर, रिता धावतोडे, चंद्रभागा मडावी, नंदा जिरापुरे, कोमल ताजणे, मीनाक्षी वेट्टी, प्रियंका भवरे, संगीता कासार, लता ठोंबरे, करुणा तेलंग, अभिषेक श्रीवास, सुरज गुप्ता, राहुल गर्जे, सुरज जैन, अश्विन बोपचे, शुभम सरकाळे, राजू झामरे, शुभम चोरमले, स्वप्नील उलंगवार, अजय धुरट, अंकुश पांडे, वैभव काळे, योगेश पाटील, अजिंक्य शिंदे आदी सहभागी झाले होते.
नेर तहसीलसमोर धरणे
नेर : येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी पंजाबराव शिरभाते, विजय खडसे, पुरुषोत्तम लाहोटी, गजानन काळे, सुशील सोनोने, सचिन कराळे, योगेश दहेकर, विजय सरडे, योगेश दहेकर, विनोद जाधव, अश्विन दावडा, योगेश गुल्हाने, साहेबराव तुपटकर, मंगलसिंग राठोड, परमानंद पिसे, प्राचार्य उदय कानतोडे, तेवीचंद राठोड, नीलेश राठोड, नारायण राठोड, अमोल तलवारे, अमर खंडारे, अमोल शिरभाते, विनोद जाधव, परमानंद पिसे, प्रीतम गावंडे, दिनेश पांगारकर, बंडू श्रीराव आदी उपस्थित होते.
राळेगाव येथे भाजपने अपहार, रेतीघाट व स्थानिक मागण्यांनाही घातला हात
राळेगाव : भाजपच्या राज्यव्यापी धरणे आंदोलनांतर्गत राळेगाव तालुका मुख्यालयी तहसीलसमोर दिवसभर धरणे देण्यात आले. उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी चित्तरंजन कोल्हे, भालचंद्र कवीश्वर, प्रीती काकडे, शोभाताई इंगोले, डॉ. कुणाल भोयर, प्रशांत तायडे, उषाताई भोयर, प्रफुल्ल कोल्हे, अक्षय जव्हेरी, अरुण शिवणकर, छायाताई पिंपरे, संतोषी सहदेव, सदाशिवराव महाजन, मोहनलाल गुंदेचा, गजानन लढी, सुधाकर गेडाम, विद्याताई लाढ, सीमा येडस्कर, बाळासाहेब दिघडे, दिनेश गोहणे, शुभम उके, पारस वर्मा आदी उपस्थित होते. राळेगाव येथील महिला पतसंस्थेतील अपहाराचे पैसे बचतकर्त्यांना सव्याज परत करणे, संस्थेच्या संचालकावर कारवाई, रेतीघाटाचे लिलाव त्वरित करावे आदी मागण्या करण्यात आल्या.
कळंब येथे निवेदन
कळंब : भाजपतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर धरणे देऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष कैलास बोंद्रे, प्रा.भय्यासाहेब दोंदल, नगर पंचायतचे उपाध्यक्ष मनोज काळे, संजय दरणे, नगरसेवक वासुदेव दाभेकर, सुरेश केवटे, विवेक अंदुरकर, प्रवीण निमकर, राजू हारगुडे, रूपेश राऊत, सरपंच दिनेश वानखडे, पवन कदम, संदीप वैद्य, वैष्णवी चिमुरकर, माधुरी केवटे, सपना कोठारी, ज्योती होरे, मुन्ना लाखिया, गणेश वाल्दे, निखिल गोधनकर आदी सहभागी झाले होते.