..... आणि तब्बल २९ हजार लिटर डिझेल लोकांनी अक्षरश: लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 10:05 AM2021-03-02T10:05:17+5:302021-03-02T10:05:53+5:30

येरद गावाजवळ डिझेलचा टँकर उलटला. हे कळताच परिसरातील गावकऱ्यांनी जमेल तसे डिझेल भरून घेण्यासाठी धाव घेतली. थोडे थोडके नव्हे या महागाईच्या दिवसात चक्क २९ हजार लिटर डिझेल घरबसल्या मिळाले..!

Tanker came Tanker came ... Fill diesel not water! | ..... आणि तब्बल २९ हजार लिटर डिझेल लोकांनी अक्षरश: लुटले

..... आणि तब्बल २९ हजार लिटर डिझेल लोकांनी अक्षरश: लुटले

Next
ठळक मुद्देपांढरकवडा मार्गावरील प्रकार : चालक, वाहक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील पांढरकवडा मार्गावरील येरद शिवारात मध्यरात्री डिझेलचा टँकर टायर फुटल्याने उलटला. याची वार्ता परिसरातील गावात पसरताच डिझेलसाठी अनेक जण डबक्या, पाईप घेऊन टँकरकडे धावत सुटले. जमेल त्या पद्धतीने डिझेल काढण्यासाठी गर्दी उसळली होती.

सुरत येथून जीजे-१२बी-एक्स-३९६९ क्रमांकाचा डिझेल टॅंकर चंद्रपूरकडे जात होता. अचानक टायर फुटल्याने येरद शिवारात तो उलटला. यात गणेश मांगाराम व धर्मेश इशाराम दोघे रा. राजस्थान हे जखमी झाले. डिझेलचा टॅंकर उलटल्याचे कळताच परिसरातील गावातील नागरिकांनी प्लॅस्टिकच्या डबक्या, पिंप घेऊन टॅंकरमधून डिझेल काढण्यासाठी एकच गर्दी केली. टँकरमध्ये असलेले २९ हजार लिटर डिझेल अक्षरश: लुटून नेण्यात आले. अपघात घडल्यानंतर खानगाव, जोमडोह येथील उपसरपंच संतोष गदई यांनी जखमी चालक व वाहकाला बाहेर काढून उपचारार्थ हलविले. या प्रकरणी वृत्त लिहिस्तोवर पोलिसांनी कुठलीही नोंद घेतलेली नव्हती.

Web Title: Tanker came Tanker came ... Fill diesel not water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.