जिल्ह्याला १५४५ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे लक्ष्य

By admin | Published: June 4, 2014 12:23 AM2014-06-04T00:23:47+5:302014-06-04T00:23:47+5:30

खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकर्‍यांची मशागतीसोबतच बी-बियाण्यांसाठी लगबग सुरू झाली आहे. शेतकर्‍यांना खरीप हंगाम चांगला घेता यावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने १५४५ कोटींच्या

The target of allocating Rs.1545 crore crop loan to the district | जिल्ह्याला १५४५ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे लक्ष्य

जिल्ह्याला १५४५ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे लक्ष्य

Next

यवतमाळ : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकर्‍यांची मशागतीसोबतच बी-बियाण्यांसाठी लगबग सुरू झाली आहे. शेतकर्‍यांना खरीप हंगाम चांगला घेता यावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने १५४५ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकर्‍यांच्या मागणीप्रमाणे जिल्ह्यात पीककर्ज वाटपास प्रारंभ करण्यात आला आहे. पीककर्जासोबतच रबी हंगामासाठी ४८ कोटीचे नियोजन असून या वर्षी ३५५ कोटी रुपयांचे मुदती कर्जही विविध बँकांच्यावतीने दिले जाणार आहे.
खरीप हंगामात शेतकर्‍यांना पीककर्जाचा मोठा हातभार लागत असतो. बहुतांश शेतकरी पीककर्जाची उचल करत असल्याने शेतकर्‍यांच्या संभावित आकडा लक्षात घेता दरवर्षी पीककर्जाचे नियोजन केले जाते. यावर्षी १५४५ कोटी रुपयाच्या पीककर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वाधिक म्हणजे ६२१ कोटी इतक्या पीककर्जाचे वितरण करणार आहे. त्या खालोखाल विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक १२0 कोटी रुपयाचे कर्ज वितरित करणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ३५३ कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया १३४ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र १0९ कोटी, युनियन बँक ऑफ इंडिया ६६ कोटी, अलाहाबाद बँक २५ कोटींच्या पीककर्जाचे वितरण करणार आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील विविध २0 राष्ट्रीयीकृत बँका शेतकर्‍यांना एकूण ८0३ कोटी रुपयांचे पीककर्ज देणार आहे.
रबी हंगामातही ४८ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांच्यावतीने दरवर्षी मुदती कर्जाचेही वितरण करण्यात येते. यावर्षी बँकांना या कर्जाचे वितरणाचेही उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात राष्ट्रीयकृत बँक २0३ कोटींचे कर्ज वितरित करतील. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक १२७ कोटी तर विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक २५ कोटी रुपयांचे मुदती कर्ज वाटप करतील. खरीप हंगामात १५४५ कोटी, रबी हंगामात ४८ कोटी मुदती कर्ज असे यावर्षी एकूण १९४८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केल्या जाणार आहे.  शासनाने पीककर्जाचे नियोजन केले असले तरी, बहुतांश बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. शेतकर्‍यांना यात त्रास सहन करावा लागतो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.(वार्ताहर)
 

Web Title: The target of allocating Rs.1545 crore crop loan to the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.