नगरपरिषदेची कर वसुली १० टक्क्यांवर

By admin | Published: January 15, 2015 10:58 PM2015-01-15T22:58:45+5:302015-01-15T22:58:45+5:30

नगरपरिषदेच्या कर वसुलीला घरघर लागली असून डिसेंबर अखेरपर्यंत केवळ दहा टक्के म्हणजे एक कोटी ५० लाख रुपयांचीच कर वसूली झाली आहे. प्रत्यक्ष ११ कोटी २५ लाख कर वसुलीचे उद्दिष्ट होते.

Tax evasion of the municipal corporation is 10 percent | नगरपरिषदेची कर वसुली १० टक्क्यांवर

नगरपरिषदेची कर वसुली १० टक्क्यांवर

Next

यवतमाळ : नगरपरिषदेच्या कर वसुलीला घरघर लागली असून डिसेंबर अखेरपर्यंत केवळ दहा टक्के म्हणजे एक कोटी ५० लाख रुपयांचीच कर वसूली झाली आहे. प्रत्यक्ष ११ कोटी २५ लाख कर वसुलीचे उद्दिष्ट होते. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नगरपरिषदेची करवसुली चिंताजनक होत आहे. कर विभागातून वसुलीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात एकूण ३१ हजार मालमत्ता आहे. त्यांच्याकडून ११ कोटी २५ लाख इतका कर वसूल होणे आवश्यक आहे. यामध्ये चालू वर्षातील कर पाच कोटी सहा लाख इतका आहे. थकीत करावर पाच कोटींचा दंड लागला आहे. तर दोन कोटींच्या कराबाबत न्यायालयात खटले सुरू आहे. अशा स्थितीत कर वसुलीची मोहीम राबविताना नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. कर्मचारी केवळ पाच कोटी सहा लाखांचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन वसुली मोहीम राबविताना दिसतात. २०१२-१३ मध्ये चार कोटी ६९ लाख म्हणजे ४० टक्के वसुली झाली होती. त्यानंतर २०१३-१४ मध्ये चार कोटी २४ लाख वसुली झाली. यावर्षी पाच टक्क्याने वसुलीत घट झाली. आता पुन्हा ११ कोटी २५ लाखांचे उद्दीष्ट असून जवळजवळ दीड कोटी रुपये वसूल झाले आहे. ६५ टक्केपेक्षा अधिक कर वसुली असलेल्या नगरपरिषदांना केंद्र शासनाकडून विविध योजनेच्या माध्यमातून विकासासाठी भरघोस निधी दिला जातो. या निधीमुळेच शहराचा सर्वांगीण विकास करणे सहज शक्य होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून यवतमाळ नगरपरिषदेला वित्त आयोगाच्या निधीशिवाय दुसऱ्या कुठल्याच योजनेचा लाभ घेता आला नाही. नागरिकांनी जबाबदारी ओळखून शहर विकासासाठी कर नियमित भरणे आवश्यक झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Tax evasion of the municipal corporation is 10 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.