टीबी हॉस्पिटल व रस्ता हस्तांतरणावर नगराध्यक्षांचाच आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 09:55 PM2018-02-28T21:55:25+5:302018-02-28T21:55:25+5:30

टीबी हॉस्पिटल आणि शहरातील रस्त्यांच्या हस्तांतरणावर अर्थसंकल्पीय बैठकीत खुद्द नगराध्यक्षांनीच आक्षेप नोंदविला. कुठल्याही ठरावाला मंजुरी देण्यापूर्वी नगराध्यक्ष आणि स्थायी समितीची मंजुरी घेणे आवश्यक असते.

TB hospital and road transfer objection | टीबी हॉस्पिटल व रस्ता हस्तांतरणावर नगराध्यक्षांचाच आक्षेप

टीबी हॉस्पिटल व रस्ता हस्तांतरणावर नगराध्यक्षांचाच आक्षेप

googlenewsNext
ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषद : अर्थसंकल्पीय बैठकीत गदारोळ आणि वाद-विवाद

ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : टीबी हॉस्पिटल आणि शहरातील रस्त्यांच्या हस्तांतरणावर अर्थसंकल्पीय बैठकीत खुद्द नगराध्यक्षांनीच आक्षेप नोंदविला. कुठल्याही ठरावाला मंजुरी देण्यापूर्वी नगराध्यक्ष आणि स्थायी समितीची मंजुरी घेणे आवश्यक असते. मात्र नगरपरिषद प्रशासनाने संपूर्ण नियम पायदळी तुडविल्याचे नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी या बैठकीत सांगितले. बुधवारी झालेली अर्थसंकल्पीय बैठक आक्षेप, गदारोळ आणि वाद-विवादाच पार पडली.
नगरपरिषदेने १८३ कोटींचे अंदाजपत्रक बुधवारी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत सादर केले. हे अंदाजपत्रक सभागृहात येताच नगराध्यक्षांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी त्यावर आक्षेप नोंदविले. तर काही नगरसेवकांनी सादर अंदाजपत्रक समजत नसल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे अर्थसंकल्पीय बैठकीत आणखी गोंधळ वाढला. कुठल्याही ठरावाला मंजुरी देण्यापूर्वी नगराध्यक्ष आणि स्थायी समितीची मंजुरी घेणे आवश्यक असते. परंतु येथे सर्वनियम पायदळी तुडविण्यात आले. टीबी हॉस्पिटलसाठी नऊ कोटी रुपये परस्पर वळते करण्यात आले. त्यामुळे विकास कामांना खीळ बसली असल्याचा आक्षेप नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी नोंदविला. हा निधी परत देण्यात यावा आणि टीबी हॉस्पिटलची जागा मोफत मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावा, असे त्या म्हणाल्या. यासोबतच शहरातून जाणारे राज्य मार्ग नगरपरिषदेने हस्तांतरित करून घेतले. शहरातील रस्ते दुरुस्त करण्यासाठी पैसा नसताना राज्य मार्गाची दुरुस्ती नगरपरिषदेला करता येणे अशक्य आहे. कुणालाही विश्वासात न घेता परस्पर याबाबत ठराव पारित करण्यात आला, असा आक्षेप या बैठकीत नगराध्यक्षांनी नोंदविला. त्यांच्या या आक्षेपावर भाजपाचे पदाधिकारी चांगलेच संतापले. त्यांनी आपल्या स्वाक्षरीनेच आजची सभा बोलाविली आहे. स्थायी समितीच्या बैठकीतच या ठरावाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे अर्थसंकल्पीय मंजुरी एक औपचारिकता आहे. आता आक्षेपाला कुठलाही अर्थ नाही, असे नियोजन सभापती प्रवीण प्रजापती यांनी सभागृहात सांगितले.
यावेळी सत्ताधारी बाकावरील नगरसेविका आणि विरोधी बाकावरील नगरसेविका अर्थसंकल्पाच्या प्रती आम्हाला काही तासापूर्वी सोपविण्यात आल्या. अर्थसंकल्प आम्हाला कळला नाही. सोप्या भाषेत समजावून सांगा, असे म्हणाल्या. त्यावरून आणखीनच गोंधळ निर्माण झाला. नगरसेवक नितीन गिरी यांनी पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी केली. यावेळी नगराध्यक्षांनी या विषयावर स्वतंत्र बैठक बोलाविली जाणार असल्याचे सांगितले. सभा सुरू असताना काही महिला पाण्याचा विषय घेऊन सभागृहात धडकल्या. प्राधिकरणाचे पाणी सोडण्याच्या वेळेला मोटारपंप लावले जाते. त्यामुळे पाणी मिळत नाही. पाणी सोडताना वीज प्रवाह खंडित करावा, अशी विनंती या महिलांनी नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांच्याकडे केली.
जागा हस्तांतरणच नाही तर निविदा कशा ?
बुधवारच्या अर्थसंकल्पीय बैठकीत नियोजन सभापती प्रवीण प्रजापती यांनी टीबी हॉस्पिटल जागेच्या निविदा तत्काळ काढण्याची आवश्यकता असल्याचे मत नोंदविले. यावेळी विरोधी बाकावरील सदस्यांनी जागा हस्तांतरण होण्यापूर्वीच निविदा काढता येतात काय अशी कोपरखळी मारली. ९० कोटींचा हिशेब कसा काय देता आहात असा प्रश्न केला.
चार महिन्यात चार कोटी कसे ?
अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात ठेवीवरील व्याजाचे आठ महिन्यात १४ लाख नगरपरिषदेला मिळतील, असे म्हटले आहे. तर चार महिन्यात चार कोटींचा उल्लेख आहे. यावर सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी प्रशासनातील अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. आपले गणित विश्लेषण करून सांगण्याची विनंती केली. अधिकाºयांना उत्तरच देता आले नाही.

Web Title: TB hospital and road transfer objection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.