सातव्या वेतन आयोगासाठी शिक्षकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 09:18 PM2019-05-20T21:18:39+5:302019-05-20T21:19:39+5:30
शासन निर्णयानुसार शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू झाल्यानंतरही यवतमाळ पंचायत समितीत अद्याप वेतननिश्चिती झाली नाही. यामुळे सोमवारी शिक्षक संघाने पंचायत समितीसमोर धरणे दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासन निर्णयानुसार शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू झाल्यानंतरही यवतमाळ पंचायत समितीत अद्याप वेतननिश्चिती झाली नाही. यामुळे सोमवारी शिक्षक संघाने पंचायत समितीसमोर धरणे दिले.
यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघातर्फे सातव्या वेतन आयोगानुसार मे महिन्याचे वेतन थकबाकीसह अदा करावे, यासाठी पाठपुरावा केला. यवतमाळ पंचायत समितीने यानंतरही वेतननिश्चिती केली नाही. त्यामुळे शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष मदन पराते यांच्या नेतृत्त्वात पंचायत समितीसमोर धरणे दिले. गटशिक्षणाधिकारी शेषराव राठोड, विस्तार अधिकारी श्रीकृष्ण खोब्रागडे आणि प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजुदास जाधव यांनी धरणे आंदोलनाला भेट दिली. यावेळी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी २४ मेपर्यंत वेतननिश्चितीचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यानंतरही हा प्रश्न कायम राहिल्यास २७ मेपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनात मदन पराते, सुरेश नरवाडे, श्रीराम जिड्डेवार, शेख लुकमान, असाराम चव्हाण, गौतम कांबळे, नदीम पटेल, दीपक चौधरी, दिलीप हातगावकर, रविनाश राठोड, किशोर रननवरे, सचिन सानप, संजय वनकर, प्रफुल्ल माळोदे, केशव ठोंबरे, मेहबूब शेख, श्याम कन्नाके, संजय वाघमारे, प्रवीण कापर्तीवार, संजय उईके, संतोष राठोड, प्रमोद घावडे, रमेश जिड्डेवार, अमन शेंडगे, सुनील मनवर, प्रवीण जाधव, सुदाम चव्हाण, अरुण डोंगरे, हिरालाल राठोड, पवन लेडे, संजय आडे, गजानन हागोने, संतोष सोने आदी सहभागी झाले होते.
नेर येथे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
नेर : विविध मागण्यांना घेऊन सोमवारी येथे शिक्षकांनी धरणे दिले. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ नेरच्या पुढाकारात हे आंदोलन करण्यात आले. मे महिन्याची वेतन देयके थकबाकीसह जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे पाठविण्याचा आदेश होता. मात्र नेर पंचायत समितीने वेतन निश्चितीची प्रक्रिया अजूनही सुरू केलेली नाही. ही प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मे महिन्याच्या वेतनात अदा करावी यासह स्थानिक पातळीवरील प्रश्नांना घेऊन देऊन गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीण राणे, सचिव दिनेश कडू, राजेंद्र राणे, कृष्णा आगासे, नितीन मासाळ, केशव टेंबरे, राजेंद्र नहार, सुरेश कुलरकर, गजानन गवई, गजानन चेर, राहुल मिस्कीन, प्रदीप गाडेराव, धनंजय भांडारकर, जगदीश खाडे, प्रवीण देशमुख, अशोक मेश्राम, एकनाथ वासनिक, सुधाकर यावले, अरुण महल्ले, नंदकिशोर अलोणे, पंडित वैद्य, रवींद्र भांडे, नितेश गुप्ता, अमित इखार, एकनाथ कुकडे, राजेंद्र माहुरे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.