शिक्षक संघर्ष समितीचा सत्याग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 09:29 PM2018-06-07T21:29:51+5:302018-06-07T21:29:51+5:30
जिल्हा परिषद शिक्षकांच्या र्आनलाईन बदल्यांमध्ये अनियमितता झाली. चुकीच्या पद्धतीने बदल्या करण्यात आल्या. एकाच विषयाकरिता दोन शिक्षकांना एकाच शाळेत नियुक्त करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या र्आनलाईन बदल्यांमध्ये अनियमितता झाली. चुकीच्या पद्धतीने बदल्या करण्यात आल्या. एकाच विषयाकरिता दोन शिक्षकांना एकाच शाळेत नियुक्त करण्यात आले. यासह विविध कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या शिक्षकांनी शिक्षक संघर्ष समितीच्या नेतृत्वात बुधवारी तिरंगा चौकात सत्याग्रह आंदोलन सुरू केले.
जिल्हा परिषदेने सहाय्यक शिक्षक, विषय शिक्षक, उच्चश्रेणी मुख्याध्यापक आदींच्या बदल्या केल्या. यात २०० च्यावर शिक्षकांच्या चुकीच्या पद्धतीने बदल्या करण्यात आल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे. यामुळे विस्थापित शिक्षकांना त्यांचे विकल्प मिळाले नाही. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतरही संवर्गनिहाय्य याद्या आणि चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाºया शिक्षकांवर कोणतीही कारवाई झाली नाही. यामुळे शिक्षक संघर्ष समितीने बदली यादी प्रसिद्ध करण्याची मागणी लावून धरली आहे.
३० किलोमीटर अंतरावरील पती-पत्नी एकत्रीकरण झाले नाही. समान तत्व वापरले गेले नाही. बदलीपूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे गरजेचे होते. त्यांचे समायोजन झाले नाही. त्या शिक्षकांच्या आता बदल्या करण्यात येत आहे. विकल्पातील २० गावांमध्ये बदली दिली जाणार होती. यातील पाच ते सहा गावे रिक्त असताना शिक्षकांना त्या ठिकाणी बदली मिळाली नाही. एकट्या यवतमाळ तालुक्यात अशा १५० च्यावर तक्रारी आहे. या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी बदलीग्रस्त शिक्षक संघर्ष समितीने आंदोलन सुरू केले आहे. ज्ञानेश्वर नाकाडे, रमाकांत मोहरकर, प्रमोद कांबळे, गजानन पोयाम, पुंडलिक बुटले, मंगेश फुटाणे, कपिल गुंठेवार, शशिकांत लोळगे, रवींद्र कोल्हे, महेंद्र वेरूळकर, अतुल खासरे, नीलेश पत्तेवार, गजानन उत्तरवार, नीलेश ठाकरे, विजय ठाकरे, संजय राऊत, प्रकाश सालपे, संध्या जाधव, पुष्पा तायडे, वैशाली तिजारे, सुनिता काळे, कल्पना गोदमले, प्रतिभा मलकापुरे, अर्चना होलके यांच्यासह अनेक शिक्षक आंदोलनात सहभागी आहे.