शिक्षकांनी झिडकारली आॅनलाईन कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 09:47 PM2017-10-02T21:47:39+5:302017-10-02T21:48:03+5:30
शिक्षण विभागातील अधिकाºयांकडून मोबाईलवर पाठविले जाणारे आदेश यापुढे पाळायचेच नाहीत, असा एल्गार पुकारत सर्व शिक्षक संघटनांनी आॅनलाईन कामे झिडकारली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिक्षण विभागातील अधिकाºयांकडून मोबाईलवर पाठविले जाणारे आदेश यापुढे पाळायचेच नाहीत, असा एल्गार पुकारत सर्व शिक्षक संघटनांनी आॅनलाईन कामे झिडकारली आहेत. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून सोमवारी जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांपुढे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. तर शिक्षकांच्या व्हॉट्सअप ग्रूपमधून अधिकाºयांना धडाधड काढून टाकण्यात आले.
शिक्षक संघटना समन्वय कृती समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. प्रत्येक तालुक्यातील सर्व संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन तालुका समन्वय समिती तयार करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून स्थानिक पंचायत समितीसमोर धरणे देण्यात आले, अशी माहिती जिल्हा समन्वयक रवींद्र कोल्हे, पुरुषोत्तम ठोकळ यांनी दिली.
आॅनलाईन कामांसाठी प्रत्येक केंद्रावर डाटा एंट्री आॅपरेटर व ब्रॉडबॅण्ड कनेक्शनची व्यवस्था करण्यात यावी, पोषण आहाराचा धान्यादी किराणामाल शासनानेच पुरवावा, मुख्याध्यापकावर खरेदीची सक्ती करण्यात येऊ नये, अधिकाºयांनी मोबाईलवर आदेश पाठवू नये, लेखी स्वरुपात पाठवावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. बहिष्काराचा पुढील टप्पा म्हणून ९ आॅक्टोबर रोजी जिल्हास्तरीय आंदोलन होणार आहे. त्यादृष्टीने ५ आॅक्टोबर रोजी सर्व तालुका समन्वयकांची सभा जिल्हा परिषद गार्डन येथे होणार आहे.
यवतमाळ पंचायत समितीसमोर जिल्हा समन्वयक रवींद्र कोल्हे यांच्यासह मधुकर काठोळे, मनोज रामधनी, ज्ञानेश्वर नाकाडे, गजानन देऊळकर, राजूदास जाधव, विनोद गोडे, रमाकांत मोहरकर, दिगांबर जगताप, सुभाष धवसे, गजानन पोयाम, प्रकाश सालपे, महेंद्र वेरुळकर, नंदकिशोर वानखडे, विनोद डाखोरे नदीम पटेल, साहेबराव पवार आदी उपस्थित होते. पांढरकवड्यात शिक्षकांनी आमदार राजू तोडसाम यांना निवेदन दिले. मारेगाव पंचायत समितीसमोर झालेल्या आंदोलनात तालुका समन्वयक विठ्ठलराव ठावरी, दिवाकर राऊत, तुषार आत्राम, धर्मराज सातपुते, चंद्रकांत सुके, धवस, हरीष दरबेशवार, संतोष बोरकर, संजय फुलबांधे, हिरामण आगे आदींनी पुढाकार घेतला. तर नेर येथे सतपाल सोवळे, प्रवीण राणे, गणेश देऊळकर, भगवंत राऊत, प्रदीप खंडारकर, विठ्ठल आरू, नंदकिशोर वानखडे, दिनेश कडू, दर्पण माळवी, चंद्रशेखर तिखे आदी आदींनी सत्याग्रह केला.
आर्णी येथे जिल्हा समन्वय समितीचे राजुदास जाधव, तालुका समन्वयक सुदर्शन चव्हाण, प्रकाश हटवारे, राजू परमार, प्रदीप नागापुरे, राजकुमार खोंडे, एन. आय. खान, गजानन जगताप, सुरेश कुडसंगे, संतोष मरगडे, अबरार बेग मिर्झा आदींचा सहभाग होता. सूत्रसंचालन आसाराम चव्हाण यांनी तर आभार बबनराव मुंडवाईक यांनी मानले.
कळंब येथे उत्तम पवार, गौतम कांबळे, जयवंत डुबे, सुनिल भोयर, अजय अक्कलवार, दीपक चांदोरे, मंदार पुंडशास्त्री, प्रवीण कापर्तीवार, बाबा घोडे, विकास दरणे, जगदीश ठाकरे, नरेंद्र धोबे, महेश खोडके, यशोदा नामुर्ते, प्रियंका राऊत, पाशा गट्टवार, रमेश बरडे, प्रशांत उमरतकर, संजय आसूटकर, योगेश बोदडे, वनिता वानखडे, पवन लेंडे, कविता उईके, नंदा झगडे सहभागी होते. राळेगावातही सर्व मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षकांनी सहभाग घेतला.