पुसदला वेतननिश्चितीसाठी शिक्षकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 10:18 PM2019-03-29T22:18:51+5:302019-03-29T22:20:00+5:30
माध्यमिक शिक्षण विभागातर्फे येथे आयोजित दोन दिवसीय पेफिक्सेशन शिबिरात शहरासह तालुक्यातील खासगी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : माध्यमिक शिक्षण विभागातर्फे येथे आयोजित दोन दिवसीय पेफिक्सेशन शिबिरात शहरासह तालुक्यातील खासगी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शुक्रवारी पहिल्या दिवशी तालुक्यातील ६४ माध्यमिक शाळांपैकी ३९ शाळांनी शिबिरात शिक्षकांच्या सेवापुस्तिका सादर करून पेफिक्सेशन करून घेतले.
माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक चवणे, जिल्हा वेतन पथक अधीक्षक प्रमोद सोनटक्के व लेखाधिकारी यू.डी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुणवंतराव देशमुख विद्यालयात शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस तालुकास्तरीय वेतननिश्चिती शिबिर होत आहे. याप्रसंगी लेखाधिकारी यू.डी. चव्हाण यांच्या नेतृत्वात कनिष्ठ लेखा परीक्षक एस.व्ही. देवळे व एन.यू. फाटकर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेत आहे. या शिबिरात विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर असोसिएशनचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा.प्रकाश लामणे, मुख्याध्यापक अजय खैरे, अशोक पोले, मुख्याध्यापक सादिक शेख, मुख्यापक संजीवकुमार वाघमारे, सुरेश नारखेडे, दत्ता शिंदे, नितीन लोळगे, नितीन धनरे, प्रदीप रंगारी, नफिसखॉ पठाण, भाऊ खिल्लारे, भाऊ ठाकरे उपस्थित होते.
तालुक्यातील ६४ शाळांमधील एक हजार प्रस्ताव अपेक्षित आहे. पहिल्या दिवशी ४०० प्रस्ताव दाखल करण्यात आले. तर शनिवारी उर्वरित प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन लेखाधिकारी चव्हाण यांनी केले आहे. पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने मोठी गर्दी पाहायला मिळाली.