शिक्षकांचे वेतन रखडले

By admin | Published: June 3, 2016 02:26 AM2016-06-03T02:26:52+5:302016-06-03T02:26:52+5:30

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे एप्रिल व मे या दोन महिन्याचे वेतन झाले नसल्याने त्यांना प्रचंड आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Teacher's salary stops | शिक्षकांचे वेतन रखडले

शिक्षकांचे वेतन रखडले

Next

आर्थिक अडचण : शिक्षक संघाचे शिष्टमंडळ ‘सीईओं’ना भेटले
यवतमाळ : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे एप्रिल व मे या दोन महिन्याचे वेतन झाले नसल्याने त्यांना प्रचंड आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजूदास जाधव यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. दोन महिन्याचे वेतन तत्काळ अदा करण्याची मागणी त्यांनी केली.
शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेला करण्याचे शासनाचे धोरण आहे. तरीही मागील वर्षभरात जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे वेतन कधीही १ तारखेला झालेले नाही. आताही एप्रिल व मे महिन्याचे वेतन प्रलंबित आहे. वेतनाला होणाऱ्या विलंबामुळे जिल्ह्यातील शिक्षक हैराण आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंघला यांची राजूदास जाधव यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने भेट घेऊन दोन महिन्याचे वेतन करण्याची विनंती केली. यावेळी लगेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांना वेतन तत्काळ करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी शिष्टमंडळाने बदलीचा प्रश्न उपस्थित केला. ८० टक्के शिक्षकांच्या बदल्या सोईच्या झाल्याने संपूर्ण बदली प्रक्रिया रद्द न करता अन्यायग्रस्तांच्या आदेशात अंशत: बदल करून आदेश निर्गमित करण्याची विनंती शिष्टमंडळाने केली.
बदली प्रसंगी तीन दिवस चार हजार शिक्षकांची बसण्याची, पाण्याची आणि यादी पाहण्याची व्यवस्था शिक्षक संघाने केली होती. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याबद्दल त्यांनी शिक्षक संघाचे कौतुक केले. शिष्टमंडळात गौतम कांबळे, राजेंद्र पिंपळशेंडे, दीपक दोडके, रवी आडे, शेख लुकमान, सुरेश नरवाडे, विजय डंभारे, आसाराम चव्हाण, नदीम पटेल, रवी राठोड, सुदर्शन चव्हाण, बबनराव मुंडवाईक, सुनील राठोड आदींचा समावेश होता. (वार्ताहर)

Web Title: Teacher's salary stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.