व्यसनमुक्त समाजासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा

By admin | Published: July 14, 2017 01:47 AM2017-07-14T01:47:22+5:302017-07-14T01:47:22+5:30

शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. शिक्षकाने योग्य प्रकारे योगदान दिले तर समाजपरिवर्तन होऊ शकते.

Teachers should take initiative for an addictive society | व्यसनमुक्त समाजासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा

व्यसनमुक्त समाजासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा

Next

माधुरी आडे : मुख्याध्यापकांचा गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. शिक्षकाने योग्य प्रकारे योगदान दिले तर समाजपरिवर्तन होऊ शकते. शिक्षकांनी व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी केले.
सलाम फाऊंडेशन मुंबई आणि आर्णी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने तालुक्यातील तंबाखुमुक्त शाळांच्या मुख्याध्यापकांच्या गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे सभापती सूर्यकांत जयस्वाल, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, पंचायत समिती सदस्य रवी राठोड, अनुप जाधव, विलास अगलदरे, ज्योती उपाध्ये, राजुदास जाधव, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके आदी उपस्थित होते.
माधुरी आडे म्हणाल्या, संपूर्ण आर्णी तालुक्यातील शाळा तंबाखूमुक्त होणे ही अभिनंदनीय बाब आहे. व्यसनमुक्तीच्या कार्यासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. संचालन आसाराम चव्हाण यांनी तर आभार सतीश मुसकुंदे यांनी मानले. यशस्वीतेसाठी राजेश जुनघरे, नितीन मेश्राम, भास्कर डहाके, अमीन शेख, राहुल गजभिये, अनिल भालेराव, बबनराव मुंडवाईक, रवी चिद्दरवार, राजू राठोड यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Teachers should take initiative for an addictive society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.