शिक्षकांच्या समस्या निकाली काढणार

By admin | Published: August 25, 2016 01:46 AM2016-08-25T01:46:38+5:302016-08-25T01:46:38+5:30

जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या जिल्हास्तरीय सर्व समस्या तत्काळ मार्गी लावल्या जाईल,

Teachers will solve problems | शिक्षकांच्या समस्या निकाली काढणार

शिक्षकांच्या समस्या निकाली काढणार

Next

दीपक सिंगला : प्राथमिक शिक्षक संघाला आश्वासन
यवतमाळ : जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या जिल्हास्तरीय सर्व समस्या तत्काळ मार्गी लावल्या जाईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक सिंगला यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिले. शिक्षक कल्याण निधी पूर्ववत सुरू करा, यासह १५ समस्यांबाबत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा परिषदेसमोर बैठा सत्याग्रह केला. या पार्श्वभूमीवर शिक्षक संघाचे अध्यक्ष राजुदास जाधव यांच्या नेतृत्त्वात शिष्टमंडळाने सीईओंची भेट घेतली.
यावेळी विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेला अदा केले जाईल, असे आश्वासन दिले. वेतनानंतर आठ दिवसात झालेली सर्व कपात वित्तीय संस्थांना पाठविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या जाईल, असे सांगितले. शिक्षक कल्याण निधी सर्व शिक्षकांच्या हिताची असल्याने ती पुन्हा सुरू करावी यासाठी शिष्टमंडळाने आग्रह धरला. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुळकर्णी, राजेश गायनर, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर आदी उपस्थित होते.
शिक्षक संघाच्या आंदोलनाला जिल्हा परिषदेचे तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. आंदोलनासाठी शिक्षक संघाचे सरचिटणीस विनोद गोडे, आसाराम चव्हाण, गौतम कांबळे, शेख जलील, शरद इंगळे, आनंद कुंबरकर, अशोक तांदळे, संजय ढोले, शत्रुघ्न चव्हाण, साहेबराव राठोड, सुनील राठोड, नदीम पटेल, मदन पराते, प्रवीण राठोड, शेख लुकमान, संजय इंगोले, भानुदास राऊत, अजय अक्कलवार, सचिन गिराम, दीपक चौधरी, दीपक दोडके, राजेंद्र पिंपळशेंडे, संजय आगुलवार, चित्तरंजन कडू, सुदर्शन चव्हाण, बबन मुंडवाईक, विजय डंभारे, काशीनाथ आडे, गणेश कदम, विजय मिरासे, रवी आडे यांच्यासह शिक्षक संघाचे पदाधिकारी, सदस्य आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)

Web Title: Teachers will solve problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.