टेन्शन आलेय? एक फोन करा, रिलॅक्स व्हा; महाराष्ट्रात ३८३ शिक्षकांची चमू देणार धीर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 12:41 PM2023-02-13T12:41:36+5:302023-02-13T12:45:22+5:30

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन

team of 383 teachers in Maharashtra will give support handling pressure of exams through counselling for 10th-12th students | टेन्शन आलेय? एक फोन करा, रिलॅक्स व्हा; महाराष्ट्रात ३८३ शिक्षकांची चमू देणार धीर

टेन्शन आलेय? एक फोन करा, रिलॅक्स व्हा; महाराष्ट्रात ३८३ शिक्षकांची चमू देणार धीर

Next

अविनाश साबापुरे

यवतमाळ : परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढते. ही बाब लक्षात घेता विद्यार्थ्यांना धीर देण्यासाठी विद्या परिषदेने ३८३ समुपदेशकांचा चमू सज्ज केला आहे. या शिक्षकांचे मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आले असून विद्यार्थी कोणत्याही क्षणी त्यांच्याशी संवाद साधून आपल्या अडचणी दूर करू शकणार आहेत.

सध्या दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून काही दिवसांतच परीक्षेला प्रारंभ होणार आहे. या काळात विद्यार्थ्यांचा धीर खचून त्यांनी घातक पाऊल उचलू नये यासाठी एससीईआरटीने समुपदेशकांची फळी उभी केली आहे. परीक्षापूर्व कालावधी, परीक्षे दरम्यानचा कालावधी, परीक्षेनंतरचा कालावधी तसेच निकाल लागल्यानंतरच्या कालावधीत ही समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध राहणार आहे. या समुपदेशकांकडून विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताणतणाव कमी करणे, तसेच करिअरविषयक मार्गदर्शनही मिळणार आहे. ३८३ समुपदेशकांची यादी व त्यांचे मोबाईल क्रमांक एससीईआरटीचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. तसेच हे क्रमांक सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही सोपविली आहे.

कोणत्या जिल्ह्यात कुणाशी करावा संपर्क

  • अमरावती : चंद्रशेखर गुलवाडे, अरुणा मार्डीकर, अभिजित देशमुख, मनीष भडांगे, रिझवान खान
  • भंडारा : विजय आदमने, गायत्री भुसारी, मो. कलीम मो. हाजी
  • बुलढाणा : संतोष लालवानी, संजय तातोबा राठोड, प्रल्हाद खरात, नंदकिशोर लघे, व्ही. टी. भास्कर
  • चंद्रपूर : विजय वैरागडे, सुधीर डांगे, केशव घरत, रवींद्र गुरनुके, सतीश पाटील, प्रवीण आडे, राकेश रहाटे
  • गडचिरोली : महादेव देवराम, विनोदकुमार कोरेटी, अनिल नुटीलकंठवार
  • गोंदिया : लक्ष्मीकांत लांजेवार, मिलिंद रंगारी, आनंद लांजेवार, अजय भिवगडे
  • नागपूर : प्रतिमा मोरे, मोहन भेलकर, गिरधारी चव्हाण, विशाल गोस्वामी, हरीश राठी
  • वर्धा : राजेश सातपुते, शरद वांढरे, विठ्ठल पाटील, निलकांत गुल्हाने, डाॅ. रत्ना चौधरी, पुरुषोत्तम शेकर
  • यवतमाळ : संजय वर्मा, किशोर बनारसे, भगवान पाचभाई, सुभाष निगुरे, प्रवीण मलकापुरे, एस. एम. खैरे
  • अकोला : युनूस खान

कुणबी विद्यार्थ्यांसाठी सरसावले ‘सारथी’

दहावी-बारावीमधील कुणबी, मराठा विद्यार्थ्यांच्या मनातही परीक्षेची काळजी राहू नये, त्यांना करिअरविषयक मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘सारथी’ संस्थेनेही समुपदेशकांची फळी उभी केली आहे. त्यांच्या माध्यमातून अमरावती येथे पाच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरही घेण्यात आले. यावेळी अमरावती उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, सुरेश राहाटे, डायट अधिव्याख्याता प्रवीण राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांची नोंदणी करून समुपदेशक किशोर बनारसे, प्रवीण मलकापुरे, चंद्रशेखर गुलवाडे, मनीष भडांगे यांनी करिअर मार्गदर्शन केले. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेने घेतलेल्या या शिबिरातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळाला.

Web Title: team of 383 teachers in Maharashtra will give support handling pressure of exams through counselling for 10th-12th students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.