घोषवादनात ‘वायपीएस’ची चमू पहिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:01 AM2018-02-06T00:01:19+5:302018-02-06T00:01:44+5:30
विद्यार्थ्यांमध्ये उपजतच असलेल्या घोषवादन आणि संचलन या गुणांच्या विकासाकरिता क्रीडा भारतीतर्फे येथील वीर सावरकर क्रीडांगणावर आंतरशालेय घोषवादन स्पर्धा घेण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : विद्यार्थ्यांमध्ये उपजतच असलेल्या घोषवादन आणि संचलन या गुणांच्या विकासाकरिता क्रीडा भारतीतर्फे येथील वीर सावरकर क्रीडांगणावर आंतरशालेय घोषवादन स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये यवतमाळ पब्लिक स्कूलच्या चमूने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने राष्ट्रगान आणि देशभक्तीपर घोषवादन सादर केले.
यवतमाळ पब्लिक स्कूलचे २१ विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये शिव उदासी, भूषण जाधव, ओम शास्त्रकार, आलाप कासलीकर, वेदांत तुमसरे, ओम कामदार, हर्ष मानधना, मानस गाबडा, तन्मय सदांशिव, यश मानकर, अस्मी कोल्हटकर, अनुश्री ढोले, श्रेया पंडित, देवकी गोपलानी, अस्मी अहीरराव, साक्षी ढबाले, सेजल बुधलानी, विनंती नथवानी, समीक्षा माहुरे, ज्योती राजा, कशीश जेसवानी यांचा समावेश होता. स्पर्धेसाठी प्रामुख्याने बासरी, साईड ड्रम, बिगुल, ड्रमपेट, ट्रिंगल या वाद्यांचा प्रयोग केला गेला. शाळेचे संगीत शिक्षक सचिन वालगुंजे यांच्या मार्गदर्शनात ही चमू तयार झाली. शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.